Rajesh Patil, PCMC Commisioner Sakal Media
पिंपरी-चिंचवड

पिंपरी: प्रत्यक्षात ऑक्सिजन गळती झालीच नाही; आयुक्तांचं स्पष्टीकरण

तांत्रिक बिघाडामुळं काही काळ गोंधळ झाला

Amit Ujagare (अमित उजागरे)

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजनची गळती झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. मात्र, ऑक्सिजन टाकीत भरताना काही तांत्रिक बिघाडामुळं काही कोळ गोंधळ निर्माण झाला पण तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करण्यात आला त्यामुळे प्रत्यक्षात ऑक्सिजनची गळती झाली असल्याचं स्पष्टीकरण पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

याबाबत आयुक्त राजेश पाटील म्हणाले, "सायंकाळी साडेसातच्या सुमारास वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरुप ऑक्सीजन एका टाकीमध्ये भरला जात होता. त्यावेळी टाकीतील दाब कमीअधिक होत होता. त्यामुळे जादा दाब देण्यासाठी असलेले सुरक्षा वॉल्व्ह सुरु केले. मात्र, त्यात अचानक बिघाड झाला. यानंतर तात्काळ राखीव असलेल्या सुरक्षा वॉल्व्हचा वापर केला. त्यामुळे प्रत्यक्षात कोणतीही गळती झालेली नाही"

सर्व रुग्ण आणि ऑक्सिजन टाक्या सुरक्षित

रुग्णालयात ३०० रूग्ण आहेत तसेच दीड तासांहून अधिक काळ चालेल इतका ऑक्सिजनचा बॅकअप आहे. ज्या टँकमधून हा ऑक्सिजन सोडला तो दोनपासून ३० खाटांपर्यंत असणाऱ्या अतिदक्षता विभागासाठी आणि सुमारे १०० रूग्ण ठेवलेल्या एका मजल्यासाठी जाणार होता. त्यामुळे सर्व रुग्ण आणि इतर ऑक्सिजनच्या टाक्या सुरक्षित आहेत, असंही यावेळी पाटील यांनी सांगितलं.

ऑक्सिजन सुविधेचं झालंय ऑडिट

रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधेचं यापूर्वी सीओईपीच्या बायोमेडिकल विभागाने ऑडिटही केलं होतं, अशी माहितीही यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT