Metro Passenger Two Wheeler on Footpath sakal
पिंपरी-चिंचवड

Pune Metro : मेट्रोने जा... पण स्थानकापर्यंत चालत या!

पिंपरीपासून निगडीपर्यंत विस्तार; वाहनतळाचे नियोजन नाही

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - मेट्रोमार्गाचे पिंपरीपासून निगडीतील शक्ती-शक्ती चौकापर्यंत विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, त्यातील कोणत्याही स्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा नसेल. कारण प्रशासनाच्या दृष्टीने मेट्रो स्थानकांच्या परिसरात ‘वाहनतळ’ ही संकल्पनाच नसल्याने प्रवाशांनी घरापासून स्थानकापर्यंत चालत जायचे किंवा पीएमपी बस अथवा रिक्षाने जायचे. पण असे होताना सद्यःस्थितीत कार्यान्वित स्थानकांबाबत दिसत नाही.

परिणामी, या स्थानकांप्रमाणेच नवीन होणाऱ्या स्थानकांच्या परिसरातील पदपथांवरच बेशिस्तपणे दुचाकी उभ्या करून बिनधास्तपणे आपापल्या कामाच्या ठिकाणी प्रवाशांनी निघून जायचे, अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गाचे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत विस्तारीकरण केले जात आहे. या ४.५१ किलोमीटर मार्गाचे बांधकाम सुरू झाले असून ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सद्यःस्थितीत पिंपरी ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरू आहे. तेथून पुढे रामवाडी व वनाजपर्यंत गाडी बदलून जाता येते. पिंपरी-स्वारगेट मार्गातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढे त्याचा विस्तार कात्रजपर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे निगडीतील भक्ती-शक्तीपासून ते कात्रजपर्यंत थेट प्रवास करता येणार आहे.

सद्यःस्थितीत सुरू असलेल्या मार्गात पिंपरी (पीसीएमसी), संत तुकारामनगर (वल्लभनगर), भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी असे सहा स्थानके शहरात आहेत. तेथून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. या स्थानकांना जोडण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची फिडर बससेवा सुरू केली आहे.

तरीही बहुतांश प्रवासी आपल्या दुचाकींनीच मेट्रो स्थानकांपर्यंत येतात. स्थानकांच्या परिसरात जागा मिळेल तिथे दुचाकी उभी करून मेट्रोने पुढील प्रवास करतात. सायंकाळी कामावरून आल्यानंतर आपापल्या दुचाकी घेऊन घरापर्यंत पोहोचत आहेत.

मेट्रोच्या दोन स्थानकांतील अंतर साधारणपणे पाचशे मीटर आहे. तिथपर्यंत प्रवाशांनी चालत येणे किंवा सार्वजनिक प्रवासी वाहतूक साधणे वापरणे अपेक्षित आहे. मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस व्यापारी संकुले असून, जमिनीच्या किमती अधिक आहेत. शिवाय, प्रवाशांची वाढती संख्या पाहता, तितक्या वाहनांसाठी वाहनतळ निर्माण करणे अशक्य आहे. त्यावर उपाय म्हणून पीएमपीची फि़़डर सेवा बळकट करण्यावर भर दिला आहे. मात्र, महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास संयुक्तपणे वाहनतळ विकसित करण्याचे विचाराधीन आहे. त्यासंदर्भात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना पत्र दिले आहे.

- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, जनसंपर्क, महामेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

राज्य शालेय पोषण आहाराची परदेशात तस्करी? सीआयडीमार्फत चौकशीची मागणी, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT