crime sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

यात फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘तू माझ्याकडे डोळे वटारून बघतो का. थांब तुला दाखवतोच’ असे म्हणत तरुणावर कोयता व सिमेंटच्या गट्टूने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी चार जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पिंपरीतील लालटोपीनगर येथे घडली.

नबीलाल बंदगी शेख (रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमीत ससाने (वय २४), साजन ससाने (दोघेही रा. अमृतेश्वर कॉलनी, मोरवाडी कोर्टाच्या मागे, पिंपरी) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे शनिवारी (ता. २८) दुपारी साडेबाराच्या सुमारास लालटोपी नगर येथील महाराष्ट्र टी हाऊस या चहाच्या दुकानात चहा पीत होते. त्यावेळी आरोपी कोयते घेऊन आले.

आरोपी सुमीत याने फिर्यादी यांना ‘तू माझ्याकडे डोळे वटारून बघतो का. थांब तुला दाखवतोच’ असे म्हणत कोयत्याने व सिमेंटच्या गट्टूने मारले. यात फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Exam: नीट पेपर लीक प्रकरणात नवा खुलासा; २७ एप्रिललाच शुभमच्या हातात प्रश्नपत्रिका... उत्तर प्रदेश - हरियाणा कनेक्शनही समोर

Latur News: लातुरच्या शिक्षण बाजारात ५०० कोटींची उलाढाल, प्रामाणिक पॅटर्नला क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेनं गालबोट, 'मॅनेज'साठी नवा फंडा

शेतकरीपुत्राने कसं उभारलं RCC क्लासेसचं १०० कोटींचं साम्राज्य, एक खोली ते ८ शहरांमध्ये विस्तार; कोण आहे शिवराज मोटेगावकर?

Akola News: पाच दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा; पारा ४६.३ अंशांवर : दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळा; आरोग्याला जपा

Latest Marathi News Live Update : आज विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT