Sharad Pawar Vilas Lande sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : विलास लांडे नक्की कुठे? शरद पवार यांच्या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

एकत्रीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडून दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस झाल्यांनतर जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नेत्यांमध्ये उभी फूट पडली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - एकत्रीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडून दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस झाल्यांनतर जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नेत्यांमध्ये उभी फूट पडली. या धामधुमती जिल्ह्यातील काही नेते दोन्ही नेत्यांच्या संपर्कात राहत आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये काल सोमवारी (ता. २६) झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्याबाबत ‘आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पाठीराखा मिळाला’, अशी ‘गुगली’ टाकली. त्यामुळे विलास लांडे नक्की कुठे? या चर्चेला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मंगळवारी (ता. २७) उधान आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवता सुभा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार यांना दिले. तर; राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या वेगळा पक्ष व तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह जेष्ठ नेते शरद पवार यांना मिळाले. मात्र; जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विभागणी झाली.

शहरातील बहुतांश विकास कामे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली म्हणून कार्यकर्त्यांच्या दबावामुळे सुरुवातीला विलास लांडे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक विक्रांत लांडे व पुतणे विराज लांडे यांच्यासोबत विलास लांडेही अजित पवार यांच्या पाठीमागेच उभे राहिले.

माजी खासदार गजानन बाबर यांच्यावरील ‘संघर्षयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार व शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाले. यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले, ‘शरद पवार यांचा फोटो माझ्या वडीलांनी घरातील देवघरात ठेवला होता, ते त्याची पुजा करायचे. शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे माझी कारखाना उभी राहिली. आज त्या कारखान्यात तीन हजार कामगार आहेत.’

यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या कारखान्यात तीन हजार कामगार कार्यरत असल्याचे आता सांगितले. हे ऐकून माझ्या डोक्यावरचे ओझे उतरले. आता निवडणूक आली आहे. उद्या निवडणुकीला पाठीराखा पाहिजे, असा विचार मी करत होतो. मात्र; विलासराव यांच्यासारखा जबरदस्त व शक्तीशाली पाठीराखा मला दिसत आहे. हा खुलासा केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.’

चर्चेस कारण की...

पवार यांच्या कार्यक्रमातील वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात ‘लांडे नेमके कुठे शरद पवार यांच्याकडे की अजित पवार यांच्याकडे’ याबाबत चर्चा सुरु झाली. मागील महिना पूर्वी विलास लांडे यांचे जावई सुधीर मुंगसे यांनी चऱ्होली (खुर्द) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी शरद पवार यांच्या समवेत विलास लांडे व्यासपीठावर होते.

त्यापूर्वीही चऱ्होलीतील वारकरी सांप्रदयाच्या कार्यक्रमालाही ते शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठावर होते. तर; थोड्या दिवसांपूर्वी झालेल्या अजित पवार यांच्या मेळाव्यालाही ते अजित पवार यांच्या समवेत व्यासपीठावर होते.

शिरुरला उमेदवारीसाठी रस्सीखेच...

शिरुर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांनी निश्‍चित केली आहे. तशी घोषणाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहिररित्या केली आहे. तर; महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपण पुन्हा रिंगणात असल्याचे नुकतेच पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महायुतीकडून जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर, माजी आमदार विलास लांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नावांचीही चर्चा आहे. अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देऊ नये, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. मात्र; ही जागा महायुतीत कोणत्या पक्षाकडे जाते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपण अजित पवार यांच्याशी बोलूनच निर्णय घेणार आहोत. मी शिरुर लोकसभा मतरदारसंघासाठी इच्छूक आहे. मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी आहे. अजित पवार देतील तो निर्णय मला मान्य आहे.

- विलास लांडे, माजी आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Student Protest: भीतीपेक्षा मोठा होता विद्यार्थ्यांचा आवाज! घरच्यांना न सांगता जंतरमंतरवर पोहोचली नम्रता; आंदोलनात झाली सहभागी

Mumbai Rain: मुंबईकरांची जीवनवाहिनी कोलमडली! विरार-डहाणू लोकलसेवा पूर्णतः बंद; प्रवाशांचे हाल

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

SCROLL FOR NEXT