Pune Metro Work Sakal
पिंपरी-चिंचवड

Pune Metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे ६८ टक्के काम पूर्ण; वाहतूक कोंडीमधून होणार सुटका

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. या मेट्रो मार्गाचे काम येत्या दोन वर्षांत म्हणजे २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.

प्रशांत पाटील

पिंपरी - शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. या मेट्रो मार्गाचे काम येत्या दोन वर्षांत म्हणजे २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या त्याचे ६८ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, वाकड, हिंजवडी परिसरातील नागरिकांना पुण्यात जाणे-येणे सोयीचे होणार आहे. सर्व कामे जलदगतीने सुरू आहेत. या मेट्रो मार्गामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीमधून बऱ्याच अंशी सुटका होणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी-माण या तिसऱ्या मेट्रो मार्गाच्या कामासाठी वाकड आणि हिंजवडी (फेज १) या भागात गर्डर आणि खांबावर पिअर कॅप बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. माण-हिंजवडी-शिवाजीनगर हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या प्रकल्पाचे संनियंत्रण आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हे काम हाती घेतले आहे.

या प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे खांब बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. स्थानक उभारणी सुरू आहे. रूळ बसविण्याचेही काम सुरू झाले आहे. त्याचे आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. पीपीपी तत्त्वावर त्याची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या ६८ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस आहे.

- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए.

या स्थानकांचा समावेश

मेगापोलिस सर्कल, एम्बेसी क्चाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय आदी.

पुणे-हिंजवडीत ४० मिनिटांत

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे आणि परिसरातून हिंजवडी आयटी पार्कमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत या मार्गावर प्रवास करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Pune Railway Station: पुणे स्थानकावर रविवारी ‘मेगाब्लॉक’; पुणे-दौंड लोहमार्गावरील कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Latest Marathi News Live Update : शहादा बर्हाणपूर महामार्गावर ट्रकचा स्फोट

SCROLL FOR NEXT