पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये नियम न पाळणारे दुकाने, कार्यालये होणार सील!

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग वाढत असल्याने कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जोडीला पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे, वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने, कार्यालये सील केली जाणार आहेत. रुग्णसंख्येनुसार वर्गवारी करून संबंधित परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केले जाणार आहेत. यात येलो (पिवळा), ऑरेंज (नारंगी) व रेड (लाल) असे झोन करून कार्यवाही केली जाणार आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने वॉररूम तयार केली आहे. यापुढील काळात वॉररूममध्ये तीन शिफ्टमध्ये २४ तास पोलिसांची नियुक्ती केली जाणार आहे. एका शिफ्टमध्ये एक पोलिस असेल. वॉररूमवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांची नियुक्ती केली आहे. 

आदेशात काय? 

- शहरातील गर्दी रोखणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न ठेवणे हे तपासण्यासाठी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आठ भरारी पथके नियुक्त केली जाणार आहेत. त्यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 
- मंडई, बाजारपेठा, रस्ते, गर्दीचे चौक येथे नियमित तपासणी केली जाणार आहे. कारवाईसाठी आठ पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. एका पथकामध्ये महापालिकेचा एक अधिकारी, दोन कर्मचारी व दोन पोलिस कर्मचारी असतील. 
- गृहनिर्माण सोसायट्या, कॉलनी, वस्त्या येथील रुग्णसंख्येनुसार त्यांच्या लक्षणानुसार तीन विभाग केले जाणार आहेत. प्रत्येक झोनमध्ये फलक लावण्यात येईल. रेड झोन सील केले जाणार आहेत. यासाठी पाच जणांचे एक पथक नियुक्त केले आहे. प्रत्येक पथकात एक अधिकारी, दोन कर्मचारी व दोन पोलिस असतील. 
- क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दोन रिक्षा किंवा टेम्पोद्वारे जनजागृती केली जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात दोन रिक्षा अशा प्रमाणे आठ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात १६ रिक्षांचा वापर केला जाणार आहे. 
- गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात पोलिसांतर्फे गस्त वाढवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 
- होम आयसोलेट रुग्णांवर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवला जात आहे. 
- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वॉररूम तयार केली जाणार आहे. 
- शहर परिवर्तन कार्यालय अर्थात सिटीओच्या सूचनेनुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाने जनजागृती फ्लेक्स लावावेत, असा आदेशही महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे ओळखावेत कंटेन्मेंट झोन 

  • झोन : रुग्ण संख्या 
  • येलो (पिवळा) : पाच टक्क्यांपेक्षा कमी 
  • ऑरेंज (नारंगी) : पाच ते २० टक्‍क्‍यांपर्यंत 
  • रेड (लाल) : २० टक्क्यांपेक्षा अधिक 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT