buldhana bus accident Sakal
पिंपरी-चिंचवड

Buldhana Bus Accident : पिंपरी-चिंचवडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मृतदेहांची ओळखही पटवता येणे अवघड

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. १ जुलै) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील मृतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींसह सर्व नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बुलढ्याण्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या या अपघातात पिंपरी-चिंचवडमधील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार वाणकर कुटुंबातील तीन महिलांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिचंवड शहरावर शोककळा पसरली आहे.

बुलढाण्यातील बस अपघातात पिंपरी-चिंचवडमधील शोभा वाणकर, वृषाली वाणकर आणि ओवी वाणकर यांचा मृत्यू झाला आहे. नाना काटे यांनी म्हटले आहे की,"बातम्यांच्या माध्यमातून बस अपघाताची माहिती मिळाली. या अपघात रहाटणी पिंपळे सौदागर येथील माझे सहकारी प्रणित वाणकर यांच्या आई, पत्नी आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बातमी पाहताना वाटलेही नव्हते की या अपघातात कुणी जवळच्या व्यक्ती असतील. हा अपघात खूपच भीषण आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळखही पटवणे अवघड आहे असे प्रणित यांनी मला सांगितले. त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत."

दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह प्रमाणात भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलडाण्यातच त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत बुलडाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT