पिंपरी-चिंचवड

प्लास्टीकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ

CD

03305

------
प्लास्टीकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ
शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण; संभ्रम दूर करण्याच्या मुख्याध्यापकांना सुचना

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२० : शाळेत वाटप करण्यात येत असलेल्या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ मिळत असल्याची तक्रारी शालेय पोषण आहार योजनेकडे वाढल्या आहेत. पोषण आहार योजनेअंतर्गत वितरीत करण्यात येत असलेला तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड आहे, असे स्पष्टीकरण तालुका प्राथमिक शिक्षण विभागाकडून दिले आहे. याबाबतचे पत्र शाळांना पाठवले असून पालकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांना पोषण आहार शिजवून देण्याऐवजी कोरडा तांदुळ वितरीत केला. राज्यात अनेक ठिकाणी या योजनेअंतर्गत वितरीत केलेला तांदूळ प्लास्टिक तांदूळ असल्याचा तक्रारी सुरू झाल्या. प्रथमच ‘फोर्टीफाइड’ तांदूळ दिला जात आहे. हा तांदूळ वाटप झाल्यानंतर तांदळात असलेल्या पोषण मूल्याची माहिती पालकांना शाळांकडून दिली गेली नाही. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम तयार होत आहे. हा तांदूळ सामान्य तांदळाच्या रंगापेक्षा पिवळसर रंगाचा आहे. तसेच वजनाने हलका असल्याने तो प्लास्टिकसदृश दिसत आहे. पाण्यात टाकताच तांदळाचे दाणे पाण्यावर तरंगत आहेत. या सर्व प्रकारामुळे व त्याबाबतची जनजागृती नसल्याने सर्व ठिकाणी वाटप झालेला तांदूळ प्लस्टिकचाच आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या पोषण अभियान अंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणारा तांदूळ प्लास्टिकसदृश असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. मात्र हा ‘फोर्टीफाइड’ तांदूळ पौष्टिक असल्याचे प्रमाणीकरण असल्यानंतरही त्याबाबतीत स्थानिक स्तरावर शिक्षण विभागामार्फत अजूनही जनजागृती केलेली नाही. त्यामुळेच या तांदळाला घेऊन अनेक उलट-सुलट चर्चा व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. फोर्टीफाइड तांदळाबाबत शाळा स्तरावर व्यापक जनजागृती होणे गरजेची आहे.
- - - - - - - -
असा आहे फोर्टीफाइड तांदूळ
या तांदळाचे नमुने संकलीत करुन प्रयोग शाळेत तपासणी केली. याबाबत भारतीय अन्न महामंडळाकडूनही अभिप्राय घेण्यात आले. यामध्ये आयर्न, फॉलिक अॅसीड, व्हिटॅमीन ए, बी१, बी२, बी५, बी६, बी१२, झिंक या पोषक घटकांचा समावेश करुन फोर्टीफाईड तांदूळ बनवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे.
- - - - - - - - - - -

फोर्टीफाईड तांदूळ हा अधिक पोषकमूल्य असलेला गुणवत्तापुर्ण तांदूळ आहे. याबद्दल विश्लेषणात्मक मुद्दे मुख्याध्यापकांनी पालक, शाळा व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आणून द्यावेत.
-प्रवीण फाटक,
शालेय पोषण आहार अधीक्षक तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT