sakal
पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीत श्रीरामनवमी उत्साहात

महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतसे आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकही जागे होऊ लागले आहेत.

CD

जुनी सांगवी, ता. ११ ः येथील ग्रामदैवत वेताळ महाराज उत्सव व श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षांनंतर गावेच्या भरल्याने समस्त सांगवीकर व पै-पाहुण्यांनी उत्सवाचा आनंद घेतला. गेली आठवडाभर सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. येथील वेताळ महाराज मंदिर, श्रीराम मंदिर, शिवमंदिर, गजानन महाराज मंदिर यांना आकर्षक विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले होते.
दोन वर्षांनंतर भरलेल्या जत्रेमुळे सांगवीकरांनी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला. सांगवीकरांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी, पै-पाहुण्यांनी उत्सवाला हजेरी लावली. समस्त सांगवीकरांच्या वतीने एकोप्याचे दर्शन घडवत उत्सवात योगदान करत वेताळ महाराज काठी मिरवणूक व अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकात्मक साकारलेल्या मंदिर रथातून सवाद्य श्रीराम मूर्ती पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या सवाद्य मिरवणुकीत महिलांनी भगवे फेटे परिधान करून पारंपरिक वेशभूषेत लेझीम खेळाचा आनंद घेतला. लेझीम, फुगडी, ढोल-ताशांचा निनाद व जयश्रीरामच्या जयघोषाने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. दोन वर्षांनंतर प्रथमच गावजत्रेतून रहाट पाळणे, घोडागाडी व विविध खेळण्यांचा बाळगोपाळांसह सर्वांनी आनंद घेतला. ग्रामदैवत वेताळ महाराज व श्रीराम नवमी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजनी मंडळ सायंकाळी हरिपाठ रात्री ८ ते ९ कीर्तन व जागर अशा धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तीमय झाले होते. सप्ताहात कैलास महाराज खंडागळे, गणेश महाराज शिंदे, संतोष महाराज पायगुडे, सतीश महाराज काळे, महादेव महाराज टेंभूकर, दशरथ महाराज मानकर, गणेश महाराज पुलकुनवार, लक्ष्मण महाराज राजगुरू यांनी कीर्तन सेवा केली. समस्त सांगवीकर ग्रामस्थांच्या वतीने उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यात समस्त सांगवीकर ग्रामस्थांसह शितोळे, ढोरे, पोंगडे, पवार, कांबळे, शिंदे, कदम, कुंभार, माकर परिवारांनी योगदान दिले. यात माजी महापौर उषा ढोरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, जवाहर ढोरे, गणेश ढोरे, शारदा सोनवणे, उज्वला ढोरे, सुनील ढोरे, सतीश साठे देशमुख, उद्योजक योगेश शितोळे आदींनी उत्सवाचे संचलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT