पिंपरी-चिंचवड

संत तुकाराम महाराज देऊळवाडा बंद

CD

देहू, ता. १२ ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थान येथील मंदिर मकर संक्रांतीला(ता.१४) दर्शनासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानने प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे. मकर संक्रांतीला देऊळवाड्यातील विठ्ठलरुक्मिणी आणि संत तुकाराम महाराज मंदिरात महिला मोठ्या प्रमाणात ओवसा वाहण्यासाठी येतात. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने देऊळवाडा आणि वैकुंठस्थान येथील मंदिर शुक्रवारी(ता.१४) पहाटे पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थाने अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि विश्वस्त मंडळाने केले आहे. शनिवारी(ता.१५) पासून नियमितपणे भाविकांना दर्शनासाठी देऊळवाडा खुला करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

सतत वस्तू हातातून पडणं, चालताना अडखळणं? मुलांमध्ये दिसणारी ही लक्षणं दुर्लक्षित करू नका; असू शकतात मेंदूतील ट्युमरचे संकेत

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

SCROLL FOR NEXT