PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

PCMC Election : डिजिटल प्रचारासाठी इच्छुकांची तयारी

महापालिका निवडणूक वेळेत होणे शक्य नाही. पुढे कधी होईल, याबाबत निश्चित माहिती नाही. मात्र, महिना- दोन महिने- सहा महिन्यांनी निवडणूक होणार हे नक्की.

सकाळ वृत्तसेवा

महापालिका निवडणूक वेळेत होणे शक्य नाही. पुढे कधी होईल, याबाबत निश्चित माहिती नाही. मात्र, महिना- दोन महिने- सहा महिन्यांनी निवडणूक होणार हे नक्की.

पिंपरी - महापालिका निवडणूक (Municipal Election) केव्हाही झाली तरी लढवायचीच. त्यासाठी आजपर्यंत केलेली विकास कामे डिजिटल माध्यमांद्वारे (Digital Media) मतदारांपर्यंत पोहोचवायची. त्यासाठी गाणी व संवादांच्या जोडीला कामांच्या ठिकाणांचे चित्रीकरण (Shooting) व छायाचित्रे (Picture) वापरायची, असा चंग बहुतांश इच्छुकांनी बांधला असून, त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.

महापालिका निवडणूक वेळेत होणे शक्य नाही. पुढे कधी होईल, याबाबत निश्चित माहिती नाही. मात्र, महिना- दोन महिने- सहा महिन्यांनी निवडणूक होणार हे नक्की. त्यात सर्वतयारीने उतरायचे, हेही अनेकांचे निश्चित आहे. यात सर्वपक्षीय विद्यमानांसह माजी कारभारी व नव्याने इच्छुकांचाही समावेश आहे. त्यामुळे सर्वांची तयारी सुरू आहे. वाहने, सार्वजनिक ठिकाणे, जनसंपर्क कार्यालये आदी ठिकाणी पोस्टर लावून, दर्शनी भागात फ्लेक्स उभारून, आपापल्या प्रभागात छोटे-मोठे कार्यक्रम घेऊन, यात्रा-जत्रांच्या निमित्ताने स्वागतपर होर्डिंग लावून अनेकांचा मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी काहींनी गाणी, व्हिडिओ चित्रण, ऑडिओ रेकॉर्डिंगचा मार्ग अवलंबला आहे. त्यासाठी गाणी लिहून घेतली जात आहेत.

त्यांना संगीतबद्ध केले जात आहे. गाण्यातील शब्दांना अनुसरून स्वतःसह केलेल्या विकासकामांचे चित्रीकरण केले जात आहे. छायाचित्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत व्हॉटस्ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांचा अधिक वापर होणार असल्याचे दिसते आहे. त्या दृष्टिने अनेकांनी काम सुरूही केले आहे. काहींनी स्वतःच्या यू-ट्यूब चॅनेलचा वापर सुरू केला आहे. त्यासाठी महापालिका सभागृहात व अन्य सभा, समारंभात केलेल्या भाषणांची ऑडिओ, व्हिडिओ क्लिप, नव्याने संवाद लेखन व विकास कामांचे केलेले चित्रीकरण वापरले जात आहे.

असा होतोय डिजिटलचा वापर

- केलेल्या प्रत्येक विकास कामाची थोडक्यात माहिती. त्याला निवेदकाचा आवाज देऊन ऑडिओ निर्मिती

- विकास कामांच्या माहितीच्या केलेल्या ऑडिओला छायाचित्र व छायाचित्रणाची जोड

- स्वतःच्या परिचयासह कामांचा अंतर्भाव असलेली गाणी रचून नामांकित गायकांच्या आवाजात संगीतबद्ध करणे

- गाण्यातील वर्णनानुसार चित्रे वापरणे अथवा विकासकामांचे ठिकाणचे छायाचित्रण वापरणे

- सोशल मीडियाद्वारे विकासकामांचे ऑडिओ-व्हिडिओ प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT