पिंपरी-चिंचवड

संत ज्ञानेश्वर संकुलात नवीन सिंथेटिक ट्रॅक टाकतेय कात

CD

भोसरी, ता. १७ ः येथील इंद्रायणीनरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक नवीन टाकण्यात येणार आहे. नवीन लॉन्सचे कामही सुरू आहे. लॉग टेनिस कोर्टाच्या नूतनीकरणाचेही काम सुरू झाल्याने क्रीडा संकुल कात टाकत आहे.

सद्यःस्थिती
- संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकच्या अंतर्भागात मोकळी रिकामी जागा
- पावसाळ्यानंतर झुडुपे, गवत वाढते
- वाढलेल्या गवतांमध्ये सापांसारख्या प्राण्यांचा अधिवास
- येणाऱ्या खेळाडूंनाही धोका
- महापालिकेच्या स्थापत्य क्रीडा विभागाने या मोकळ्या जागेत लॉन्स
- लॉन्सला पाण्याची व्यवस्था स्प्रिंकलरद्वारे

खेळाडूंमध्ये समाधान
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल १२ डिसेंबर २००८ रोजी सुरू झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एकमेव अॅथलेटिक सिंथेटिक ट्रॅक फक्त संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात आहे. त्यामुळे येथे शालेय स्पर्धेसह इतरही विविध स्पर्धा आणि सरावासाठी अॅथलेटिक खेळाडूंद्वारे याचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे या ट्रॅकची दुरवस्था झाली होती. हा सिंथेटिक ट्रॅक बदलण्याची खेळाडूंची काही वर्षांपासूनची मागणी होती. आता हा सिंथेटिक ट्रॅक बदलण्यात येणार असल्याने खेळाडूंमधून समाधान व्यक्त होत आहे.

रंगरंगोटीचे काम हाती
क्रीडा संकुलात निवारा शेड नसलेल्या दोन प्रेक्षक गॅलरी आहेत. आता या प्रेक्षक गॅलरीवर छताची व्यवस्था केल्याने क्रीडा रसिकांची ऊन, वारा, पाऊस यांपासून सुटका होणार आहे. लॉग टेनिस मैदानाच्या कोटींगसह रंगरंगोटीचे कामही महापालिकेने हाती घेतले आहे.

दृष्टीक्षेपात कामे...
- सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक : लांबी ४०० मीटर, रुंदी ८ मीटर, एकाच वेळी आठ अॅथलेटिक खेळाडू धावू शकणार
- लॉन्स : लांबी १०० मीटर, रुंदी ७७ मीटर
- दोन प्रेक्षक गॅलरी : निवारा शेड उभारण्यात आले.
- लॉग टेनिस मैदान : मैदानाच्या कोटींगसह रंगरंगोटी
- एकूण खर्च : चार कोटी २१ लाख रुपये.

‘‘भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील लॉन्सचे काम सध्या सुरू आहे. अॅथलेटिक सिंथेटिक ट्रॅकचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.’’
- अनिल झोडे, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT