पिंपरी-चिंचवड

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

CD

भोसरी, ता. २२ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकाराने कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी असणाऱ्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील महावितरणच्या इंद्रायणी सबस्टेशन ते मोशीतील कचरा डेपोपर्यंत पावर लाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, दीपक मदने, प्रमोद भोसले, मोहिनी गुळुमकर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले, उपकार्यकारी अभियंता सत्वशील शितोळे, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले म्हणाले, ‘‘महापालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्यात असून, ‘पॉवर लाइन’ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. साधारण ’पॉवर लाइन’ ची लांबी ४.५ किलोमीटर इतकी हे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रती युनिट पाच रुपये प्रमाणे आगामी २० वर्षांसाठी प्रशासनाला मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्ये बचत होणार असून, कचऱ्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता दिवसाला १४ मेगावॉट आहे.

‘‘शहराच्या स्थापनेपासून मोशी कचरा डेपोवर कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले. परिणामी, पर्यावरण आणि नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ‘भोसरी व्हीजन-२०२०’ च्या माध्यमातून आम्ही राज्यातील महत्वकांक्षी रोल मॉडेल प्रकल्प ‘वेस्ट टू एनर्जी’ हाती घेतला. हा प्रकल्प कार्यान्वित होत असून, लवकरच निर्माण होणारी वीज महापालिका प्रशानाला मिळणार आहे. त्यामुळे आश्वासन पूर्तीचा आनंद आहेच. त्यासोबत शहरातील कचरा समस्या सोडवण्यात यश मिळत आहे. याचे समाधान वाटते.’’
- महेश लांडगे, आमदार, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT