पिंपरी-चिंचवड

रावेतला एस. बी. पाटील शाळेत माझी माती माझा देश अभियान

CD

किवळे, ता. १४ : रावेत येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस. बी. पाटील पब्लिक शाळेच्या वतीने महानगरपालिकेच्या आदेशानुसार शनिवारी ‘माझी माती, माझा देश’ अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी पाचवीतील विद्यार्थ्यांनी ‘पंचप्रण’ प्रतिज्ञा घेतली. गाव ते शहरापर्यंत मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यासाठी तसेच आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरविरांचा सन्मान व्हावा याकरिता हे अभियान राबविले.
प्रत्येकाने देशाभिमान बाळगला पाहिजे तसेच साक्षर झाले पाहिजे व इतरांना साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. शूरविरांचा सन्मान करावा हे देशाचे नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असा संदेश मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी दिला.
प्रभातफेरीमध्ये १२३ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी उल्हासामध्ये ‘एकत्रित व्हा आनंदी राहा’ तसेच ‘मातीला नमन वीरांना वंदन’ ‘अनेकता में एकता - यही भारत की विशेषतः’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी शुभांगी कुलकर्णी, अर्चना प्रभुणे, रावेत पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक प्राची तोडकर आदी उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, पद्माताई भोसले, शांताराम गराडे, विठ्ठल काळभोर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT