पिंपरी-चिंचवड

दापोडीकरांसह आराध्य दैवत श्री फिरंगाई देवी

CD

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. १५ ः दापोडीचे ग्रामदैवत व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली श्री फिरंगाई देवीचे दापोडी येथे हेमाडपंती मंदिर आहे. अडीचशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर मुंबई-पुणे मुख्य रस्त्याच्याकडेला आहे. नवरात्रोत्सवात दापोडीकरांच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येतो. श्री फिरंगाई देवी हेमांडपंथी मंदिरात शिळारूपी वास करणारी देवीची मूर्ती आहे. पुरातन मंदिर असूनही हे सुस्थितीत जतन करण्यात आले आहे. माता भाविकांची इच्छापूर्ती करते ही भाविकांची श्रद्धा आहे. पंचक्रोशीत इच्छापूर्ती करणारी देवी असल्याची देवीची ख्याती आहे. कुरकुंभ हे देवीचे मूळ स्थान आहे. हीच देवी फिरत फिरत दापोडीत आली आणि दापोडी गावची ग्रामदेवता झाली, अशी आख्यायिका आहे. पुणे-मुंबई महामार्गावर आकर्षक घुमट, हेमांडपंथीय बांधकामाची उत्कृष्ट रचना असलेले देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती पंढरपूर येथून तयार करून घेतल्याचे ग्रामस्थ सांगतात. पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा बांधून पूजा विधीस सुरूवात करण्यात येते. नऊ दिवस विविध रूपात देवीची पूजा बांधली जाते. नवरात्रीत विविध धार्मिक कार्यक्रम व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी सालाबादप्रमाणे प्रथेनुसार शेवटच्या दिवशी जागरण गोंधळ करण्यात येते. नवरात्र उत्सवादरम्यान परिसरातील मान्यवरांच्या हस्ते दररोज महाआरतीचा मान देऊन उत्सव साजरा करण्यात येतो. प्रथेप्रमाणे पालखी छबिना मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी असते. उत्सवानंतर ग्रामस्थांच्या वतीने निकाली कुस्त्या, रोख पारितोषिकांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र व देशभरात नावलौकिक असणारे नामांकित मल्ल या निकाली कुस्तीत भाग घेण्यासाठी येतात. उत्सवादरम्यान परिसराला जत्रेचे स्वरूप येते. पै-पाहुण्यांची वर्दळ, बाळ-गोपाळांसाठी आनंदमेळा, मनोरंजनात्मक कार्यक्रमात लोकनाट्य तमाशा कलावंतांच्या तमाशाचे आयोजन करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT