पिंपरी-चिंचवड

भक्ती शक्ती येथे होणार ढोल-ताशांचे महावादन

CD

पिंपरी, ता. १४ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भक्ती शक्ती चौक येथे शनिवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता ढोल ताशांचे महावादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. यात शहरातील ५५ ढोल-ताशा पथकांनी सहभाग घेतला असून एक हजाराहून अधिक ढोल व ३५० ताशांचे एकाचवेळी वादन केले जाणार आहे. तब्बल ३५ मिनिटे हे वादन सुरू राहणार असून भगव्या ध्वजाला मानवंदनाही या वेळी देण्यात येणार आहे. अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती समन्वय समितीचे समन्वयक संदीप जाधव यांनी बुधवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयन महाराज भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुभेदार या चित्रपटातील कलाकार देखील हजेरी लावणार आहेत, असे त्यांनी सांगितले. आयोजन अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती समन्वय समिती, ढोल-ताशा महासंघ आणि शिवप्रेमी नागरिकांनी केले असून या कार्यक्रमाला शहरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड सहकार्यवाह जयंत जाधव, ढोल ताशा महासंघाचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विशाल मानकर, शिवजयंती समन्वय समितीचे कुणाल साठे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT