पिंपरी-चिंचवड

वडिलांसह चार जणांकडून लहान मुलीवर अत्याचार

CD

पिंपरी, ता. ६ : वडिलांसह इतर चौघांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखली पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी तेरा वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचे वडील तसेच समाधान लवटे (वय ४०), घायतडे, नितीन हराळे (वय ३२), सागर हराळे (वय २०) यांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना लवटे याने तिला पाहिले. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराबाबत तिने तिच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, १९ मे रोजी सागर हराळे याने इमारतीच्या टेरेसवर तिच्याशी अश्लील वर्तन केले.
पीडित मुलीच्या ट्यूशन टीचरचा पती घायतडे यानेही मुलीशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल केला असून, पाचही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
-------------------------------------------


---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT