Cyber Crime esakal
पिंपरी-चिंचवड

Cyber Crime: ‘या’ फाइल, लिंकवर क्लिक करू नका अन्यथा.. पोलिसांकडून आवाहन, युनियन बँकेच्या नावाचा अन् लोगोचा गैरवापर

नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांकाद्वारे आलेल्या मेसेजमधील कोणतीही लिंक, वेबसाइट अथवा फाइलवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

CD

पिंपरी, ता. १९ : युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचा लोगो आणि नावाचा वापर करून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाद्वारे नागरिकांना त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करण्याबाबत मेसेज येत आहेत. त्यामध्ये एक फाइल पाठवली जात असून ती फाइल ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जात आहे. यामधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. तरी नागरिकांनी अशा प्रकारची लिंक अथवा फाइल ओपन करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने केले आहे.

बँकेच्या नावाचा व लोगोचा वापर करून नागरिकांना मेसेजद्वारे Union Bank Addhar Update61.apk या नावाची एक फाइल पाठवली जात आहे. या फाईलद्वारे नागरिकांच्या मोबाईलमध्ये Torzon Virus पाठवून मोबाईलमधील सर्व वैयक्तिक माहिती घेतली जाते. त्या माहितीचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक आणि नुकसान केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांकाद्वारे आलेल्या मेसेजमधील कोणतीही लिंक, वेबसाइट अथवा फाइलवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT