पिंपरी-चिंचवड

गहाळ मोबाईल अ‍ॅक्टिव्ह होताच हस्तगत

CD

पिंपरी, ता. १६ : गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींची माहिती संकलित करून त्यातील अ‍ॅक्टिव्ह झालेले दहा लाख १४ हजार रुपये किमतीचे ७० स्मार्ट फोन पोलिसांनी हस्तगत केले. हे स्मार्ट फोन हे त्यांच्या मूळ मालकांना लवकरच देण्यात येणार आहेत.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२३ व मार्च २०२४ या दरम्यान अनेक मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या. त्याबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, दरोडा विरोधी विभागाने एक पथक तयार केले. गहाळ मोबाईलच्या तक्रारींची माहिती संकलित करून त्यांचा तांत्रिकदृष्ट्या तपास सुरु केला. गहाळ झालेले परंतु अ‍ॅक्टिव्ह झालेले मोबाईलची माहिती संकलित केली. त्यातून अ‍ॅक्टिव्ह मोबाईलच्या वापरकर्त्यांचे नाव व पत्ते मिळाले. पथकातील अंमलदारांनी अ‍ॅक्टिव्ह झालेले ७० स्मार्ट मोबाईल हे अमरावती, कोल्हापूर, नगर, नाशिक, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या जिल्ह्यांतून हस्तगत केले. यात नामांकित कंपन्यांच्या महागड्या फोनचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahimangad Fort : शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणारा 'महिमानगड' आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार; 'राज्य संरक्षित स्मारक' दर्जा मिळाल्यावर काय बदलणार?

free Seed Scheme: मोफत बियाण्यासाठी ३०-३५ किमी हेलपाटे; कृषी विभागाच्या भोंगळ नियोजनाने शेतकरी संतप्त, निलंग्यात कृषी विभागाविरोधात नाराजी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT