पिंपरी-चिंचवड

बालवाडी शिक्षकांच्या मानधनात १० टक्के वाढ

CD

पिंपरी, ता. ११ ः महापालिका प्राथमिक शिक्षण विभागात काम करणाऱ्या २०४ बालवाडी शिक्षक व सेविका यांना महापालिका प्रशासनाकडून ‘मॉन्सून गिफ्ट’ मिळाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये दहा टक्के वाढ देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण विभागात सध्या २०५ बालवाडी कार्यरत आहेत.
या बालवाड्यांमध्ये १९२ शिक्षिका, एक मुख्य समन्वयक, आठ समन्वयक आणि तीन बालवाडी सेविका असे २०५ कर्मचारी मानधन तत्त्वावर काम करीत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांची मानधनामध्ये दर दोन वर्षांनी एकवट मानधनाचे दहा टक्के वाढ करण्याबाबत २०२१ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये या कर्मचाऱ्यांच्या सेवेची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ पासून संबंधितांना मानधनामध्ये वाढ करणे अपेक्षित होते. त्याला यश मिळाले असून, महापालिका स्थायी समितीमध्ये संबंधित प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.

बालवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा
बालवाडीमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कर्तव्य बालवाडी शिक्षिका व सेविका करीत आहेत. दोन वर्षांच्या सेवेनंतर दहा टक्के मानधनामध्ये वाढ करावी, असा निर्णय झाला आहे. पण, २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी तांत्रिक बाबींमुळे झाली नाही. याबाबत प्रशासनास सूचना केली होती. त्यामुळे २०४ बालवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT