पिंपरी, ता. १९ : चिंचवड स्टेशन येथील श्री. जैन विद्यालयाच्या १९८५च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल चार दशकांनंतर गुरुजन आणि माजी विद्यार्थी एकत्र आल्याने मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. स्नेह, आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेने वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुजनांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील कार्यालयीन कर्मचारी आणि शिपाई यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि लेखा-जोखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. घनश्याम कांबळे आणि दिनेश नाकाडे यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षकांप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या मानपत्राचे वाचन ज्योती सोनवणे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब पाटील आणि मधुबाला पटवा यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी शुभांगी गराडे आणि ज्योती सोनवणे यांनी शाळेत मिळालेले ज्ञान, संस्कार, शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांमुळे जीवनात यशस्वी होण्यास मदत झाल्याची भावना व्यक्त केली. प्रशांत काटवटे यांनी सूत्रसंचालन केले, तर रामचंद्र पांचाळ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.