पिंपरी-चिंचवड

वाढदिवसाचा ‘धडाका’; नागरिकांना मनस्तापाचा फटका

CD

पिंपरी, ता. १३ : वाढदिवसाचा जल्लोष, मित्रमंडळींचा उत्साह आणि केक कापण्याच्या कार्यक्रमाला फटाक्यांची जोड, असे चित्र सध्या शहरातील काही भागांत पाहायला मिळत आहे. विशेषतः मध्यरात्री बाराचा ठोका पडताच फटाके फोडून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार घडत आहेत. रात्रीच्या शांततेत अचानक होणाऱ्या फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाढदिवसाचा आनंद साजरा करताना इतरांच्या शांततेचा आणि सुरक्षिततेचा विचार केला जातो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री बारा वाजण्याची वेळ साधली जाते. मित्रमंडळी एकत्र येऊन केक कापणे आणि जल्लोषाच्या नावाखाली आरडाओरडा करणे, असे ‘उद्योग’ सुरू असतात. काही ठिकाणी या सेलिब्रेशनमध्ये फटाकेही फोडले जातात. रात्रीच्या वेळी हा आवाज अधिक तीव्रतेने जाणवतो. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
असे प्रकार शहरातील चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोरील रस्ता, बर्ड व्हॅली परिसरातील रस्ता, काळेवाडी फाटा, निगडी परिसरातील दुर्गा टेकडी परिसर, त्रिवेणीनगर चौकाजवळील स्पाईन रस्ता, देहूतील गाथा मंदिर रस्ता, बाह्यवळण मार्ग, रावेत, रहाटणी येथील रस्ते, मोशीतील स्पाईन रस्ता यांसह वाकड, थेरगाव, चिखली, तळवडे, सांगवी, भोसरी, हिंजवडी, पिंपरी, दापोडी तसेच इतरही भागांतील रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी होत असतात.

उत्सव साजरा करा; पण भान ठेवा
वाढदिवस हा आनंदाचा क्षण आहे. तो साजरा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्रीची वेळ आणि फटाक्यांची आतषबाजी करणे आवश्यकच आहे, असे नाही. केक कापणे, मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण घालवणे आणि गरजू व्यक्तींना मदत करणे अशा पर्यायांतूनही वाढदिवस साजरा करता येतो. त्यामुळे स्वतःच्या आनंदासाठी इतरांची झोप, शांतता आणि सुरक्षितता धोक्यात घालू नये, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘‘परिसरात पोलिसांची सतत गस्त सुरू असते. असे प्रकार आढळल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाते. नागरिकांनी त्यांच्या परिसरात असे प्रकार आढळल्यास पोलिसांना कल्पना द्यावी, संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
- रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

‘‘वाढदिवस साजरा करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, स्वतःचा आनंद साजरा करताना इतरांना त्रास होवू नये. दिवसभर काम करून रात्री विश्रांती घेणारे नागरिक, परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, रुग्ण आणि लहान मुले यांच्यासाठी मध्यरात्रीचा मोठा आवाज त्रासदायक ठरू शकतो. काहीवेळा फटाके फोडताना रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते, याचे भान राखायला हवे.
- सुनील राजेभोसले, नागरिक, रहाटणी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT