पिंपरी-चिंचवड

प्रशासन, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे हातचे बाहुले

CD

हिंजवडी, ता. २ : ‘निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नाही, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होत नाही. प्रशासन, शासन आणि निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे हातचे बाहुले बनले आहे. दुसरीकडे ‘पैसा फेक तमाशा देख’ असा तमाशा भाजपणे सुरु केला आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (ता. २) हिंजवडीत केली.
मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ ते हिंजवडी-माण दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोग व भाजपवर सडकून टीका केली. ‘अशा परिस्थितीत भाजपच्या बुलडोझरसमोर आमचा कार्यकर्ता पाय घट्ट रोवून लोकशाही वाचण्याचा लढा लढतोय. त्यामुळे आता लोकशाही वाचविण्याचा लढा संबंध भारतभर उभा रहायला हवा,’ असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी, सपकाळ यांनी हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली. यावेळी पुण्याचे नगरसेवक प्रशांत जगताप, अभय छाजेड, प्रदेश सचिव यशराज पारखी, पुणे जिल्हा कार्यध्यक्ष लहू निवंगुणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश पारखी, कार्याध्यक्ष सचिन किर्वे यांच्यासह पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंजवडी, माणदेवी चौक, गावठाण व वाड्या वस्त्यांवर पदयात्रा काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर माणदेवी मंदिरात झालेल्या सांगता सभेत ते म्हणाले, ‘चार-पाच दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांनी राजकारण कोणत्या थरावर जाईल हे आपल्या सगळ्यांसमोर आलेले आहे. अधिक बोलणे आपल्या संस्कृतीला धरून नाही. राजकारणात असलेली सभ्यता व नेत्यांच्या ऐवजी एजंटांचा झालेला सुळसुळाट हा किती भयानक आहे ते आपल्यासमोर आहे.’
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT