पिंपरी-चिंचवड

देहू ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर; उपमुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

सकाळवृत्तसेवा

देहू : देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांनी मंगळवारी (ता. 8) काढले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे देहूचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्याचे जाहीर केले. 

आमदार सुनील शेळके, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, विशाल मोरे, माजी सरपंच रत्नमाला करंडे, कांतिलाल काळोखे, अभिमन्यू काळोखे उपस्थित होते. देहूची लोकसंख्या पन्नास हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनास दैनंदिन कारभार पाहण्यासाठी शक्‍य नसल्याने देहूतील नागरी हक्क जनजागृती सामाजिक मंचच्या वतीने 2012 या वर्षी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यासाठी मागणी केली. मंचच्या वतीने 2015 पर्यंत पाठपुरावा केला. मात्र, सरकारने दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थ संजय मोरे, माऊली काळोखे यांनी हायकोर्टात केस दाखल केली. त्या अनुषंगाने अधिसूचना, हरकती, पीएमआरडीचा अहवाल सरकारने मागवला. त्यानुसार आमदार शेळके यांच्याकडेही ग्रामस्थांनी नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी पाठपुरावा केला. शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देहूचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्याचे जाहीर केले. तहसीलदार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. या बाबत मंचचे अध्यक्ष प्रकाश काळोखे म्हणाले, "देहू पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, देहूचे तीर्थक्षेत्र म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी मंच आणि ग्रामस्थांनी महापालिकेला विरोध केला. ग्रामपंचायत कामकाज पाहण्यास मर्यादा होत्या. या पार्श्वभूमीवर मंचने नगरपंचायतीची मागणी केली.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT