पिंपरी-चिंचवड

प्रेमात आडवी आली जात, पुण्यात खराखुरा सैराट थरार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तरुणाचं एका तरुणीवर प्रेम होतं. मात्र, या प्रेमात तरुणाला त्याची जात आडवी आली. 'तू खालच्या जातीचा आहेस, तुझी लायकी आहे का, आमच्या नातेवाईक मुलीवर प्रेम करायची', असे म्हणत तरुणीच्या नातेवाइकांनी त्या तरुणाला संपवलं. ही धक्कादायक घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात ऍट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल झालाय, तर पोलिसांनी आरोपींना अटक केलीय. 

विराज विलास जगताप (वय 18) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर) यांना अटक केलीय. तसेच, आणखी दोघांना ताब्यात घेतलंय. याप्रकरणी विराजचे चुलते जितेश वसंत जगताप (रा. जगतापनगर, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिलीय. मृत विराज याचे आरोपींच्या नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींनी आपआपसात संगनमत करून रविवारी (ता. 7) रात्री दहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ विराज हा दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून धडक दिली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तो खाली पडल्यानंतर त्याला मारण्यासाठी आरोपी टेम्पोतून खाली उतरले. यामुळे घाबरलेला विराज पळून जाऊ लागला असता हेमंत काटे याने लोखंडी रॉड विराजच्या डोक्‍यात मारला. तर सागर काटे याने पाठीत दगड मारला. कैलास काटे, जगदीश काटे व अन्य दोघांनी विराजचे हातपाय पकडले. त्यावेळी जगदीश काटे म्हणाला की, "तू खालच्या जातीचा आहे. तुझी लायकी आहे का, आमच्या नातेवाईक मुलीवर प्रेम करायची, तरी तू तिच्यावर प्रेम करतो का', असं जातीवाचक बोलत तो विराजच्या अंगावर थुंकला. त्यास जबर मारहाण करून तेथेच सोडून दिलं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं विराजला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान सोमवारी (ता. 8) दुपारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी ऍट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल केलाय. तसेच, आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. पोलिस अधिक तपास करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT