asaduddin owaisi esakal
Politics | राजकारण

Asaduddin Owaisi : ‘राहुल गांधी के दो यार, इटली और मोदी’;असदुद्दीन ओवेसी

राहुल गांधी के दोन यार, इटली और मोदी असे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बीआरएस व एमआयएमच्या कथित मैत्रीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज उलटवार केला. राहुल गांधी के दोन यार, इटली और मोदी असे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

तेलंगणाच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप, बीआरएस व एमआयएम हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याचा दावा करीत आहे. त्यांच्या प्रचाराचे सूत्र तेच राहिले आहे. भाजपच्या इशाऱ्यावर या दोन पक्षाचे नेते कृती करीत असल्याचा आरोप केला आहे. याचे काही दाखलेही त्यांनी दिले होते. तेलंगणात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने या मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी एमआयएम व भाजपची छुपी युती असल्याचे मतदारांना सांगितले जात आहे.

यावरून राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत बोलताना ‘मोदी के दो यार, ओवेसी और केसीआर’ असा थेट हल्लाबोल केला होता. परंतु खासदार ओवेसी यांनी राहुल गांधी यांचाच पंतप्रधान मोदी यांच्याशी दोस्ताना असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांचा मूळ देश इटली असल्याने यावरून त्यांनी इटलीशी राहुल गांधी यांचे नाते असल्याचे सांगितले. राहुल गांधी तेलंगणात येऊन भाजपवर निशाणा साधण्याऐवजी बीआरएस व माझ्यावर टीका करीत असल्याचेही ओवेसी यांनी निदर्शनास आणून दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT