Abeer-Gulal esakal
Premier

Abeer-Gulal: 'अबीर गुलाल' मालिका येतीये प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' गाजलेल्या मालिकेचा आहे रिमेक

Abeer-Gulal: नुकताच 'अबीर गुलाल' या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

priyanka kulkarni

Abeer-Gulal: कलर्स मराठीवर सध्या अनेक नवनवीन विषयांवरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. स्पृहा जोशी (Spruha Joshi) आणि सागर देशमुख (Sagar Deshmukh) यांची मुख्य भूमिका असलेली सुख कळले या मालिकेने पहिल्या एपिसोडपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आता कलर्स मराठी वाहिनीवर नवीन मालिका प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

'अबीर गुलाल' (Abeer-Gulal) असं या नवीन मालिकेचं नाव असून मालिकेच्या प्रोमोमध्ये दोन मुलींची जन्माच्या वेळी अनोळखी कुटूंबामध्ये अदलाबदल झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. दोन अनोखी मुलींचं नशीब बदलणारी ती रात्र असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. आता या मुलींची अदलाबदल का झाली? त्यांचं नशीब यामुळे कसं बदलणार याची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळेल.

ही नवीन मालिका कलर्स कन्नडावर गाजलेल्या लक्षणा या मालिकेचा रिमेक आहे. टीव्ही अँकर हाऊ इच्छिणाऱ्या एका मुलीला केवळ सावळ्या रंगामुळे आर जे ची नोकरी स्वीकारावी लागते आणि पुढे तिचं आयुष्य कसं बदलतं याची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती. आता या कथानकात बदल करून अबीर गुलाल या मालिकेत नवीन काय ट्विस्ट पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून अभिनेत्री सुरभी भावे या मालिकेत काम करतेय. पण या व्यतिरिक्त आणखी कोण कलाकार या मालिकेत काम करणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. सुरभीने या अगोदर भाग्य दिले तू मला या मालिकेत काम केलं होतं.

ही मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. प्रोमोला जरी प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असला तरी अनेकजण बिग बॉस मराठीचा पुढील सीजन कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत. नवा सीजन पाहायला अनेकजण उत्सुक आहेत. त्यामुळे कलर्स मराठी वाहिनी बिग बॉस मराठीचा नवीन सीजन कधी जाहीर करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT