Abhishek Bachchan in king Esakal
Premier

King Movie : नायक नहीं खलनायक ! बाप-लेकीच्या सिनेमात अभिषेकची एंट्री ; अमिताभ यांनी ट्विट करत म्हंटलं...

Abhishek Bachchan in Shahrukh's upcoming Movie : अभिनेता शाहरुख खानच्या आगामी बिग बजेट 'किंग' सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चनही काम करतोय.

सकाळ डिजिटल टीम

King Movie Update : पठाण, जवान आणि डंकी या गाजलेल्या सिनेमानंतर अभिनेता शाहरुख खान आता आणखी एक बिग बजेट सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. किंग असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव असणार असून या सिनेमात त्याची लेक सुहाना खान सुद्धा मुख्य भूमिका साकारतेय आणि आता या सिनेमाच्या कास्टमध्ये अभिनेता अभिषेक बच्चनचीही एंट्री झालीये.

अमिताभ यांच्या शुभेच्छा

फिल्मफेअरने शेअर केलेल्या बातमीनुसार, किंग या सिनेमात अभिषेक बच्चन काम करणार असून या सिनेमात तो निगेटिव्ह भूमिका साकारणार असल्याचं म्हंटलं जात आहे. या विषयीची पुष्टी खुद्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिली. अमिताभ यांनी त्याच्या ट्विटरवर या बातमीचा फोटो शेअर करत "ऑल द बेस्ट अभिषेक... ही वेळ आहे!!!" असं म्हणत त्याच अभिनंदन केलं.

अभिषेक पुन्हा साकारणार खलनायक

अभिषेक आणि शाहरूख, या दोघांनी यापूर्वी 'कभी अलविदा ना कहना' आणि 'हॅपी न्यू इयर' सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले होतं आणि आता ते पुन्हा एकदा या प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत. अभिषेक या सिनेमात निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत असून या आधी त्याने ब्रीद इनटू शॅडोज, रावण या सिनेमात खलनायक साकारला होता. त्याने साकारलेल्या या भूमिकांचं, त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं आणि आता 'किंग' या सिनेमात अभिषेकची भूमिका कशी असेल हे जाणून घेण्यास त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक साकारत असलेली भूमिका ही पूर्णपणे खलनायकी ढंगाची असून तो एका क्रूर व्यक्तीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या आधी अभिषेकला अशा कोणत्याही भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिलं नसेल असा दावा या सूत्रांनी केला आहे.

शाहरुख आणि सुहाना यांनी या सिनेमाची तयारी सुरु केली आहे. या सिनेमाच्या पूर्वतयारीसाठी ते काही दिवसांपूर्वीच लंडनला रवाना झाले. तर अभिषेक लवकरच या सिनेमासाठी काम सुरू करणार असल्याचं समजतंय.

किंग हा शाहरुखचा आगामी बिग बजेट सिनेमा असून या सिनेमाची निर्मिती शाहरुखच्या रेड चिलीज स्टुडिओज बरोबरच मार्फ्लिक्स पिक्चर्स करणार आहे. सुजॉय घोष या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून ही एक ॲक्शनने पुरेपूर असलेली फिल्म असेल. २०२५ च्या अखेरीस हा सिनेमा रिलीज होईल असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT