Bigg Boss Marathi 5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : रांगडा गडी आणि सगळ्यांचा लाडका यार ! घरात प्रवेश करणार 'हे' कलाकार ; पोस्ट झाली व्हायरल

Bigg Boss Marathi New Contestant : कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचं नवीन पर्व सुरु होतंय. या नवीन पर्वात दुनियादारी सिनेमातील एक कलाकार आणि मराठी मालिकांमधील आघाडीचा कलाकार सामील होणार असल्याचं म्हंटलं जातंय.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचं नवीन पर्व सुरु होतंय. पाचव्या सीजनमध्ये अनेक सेलिब्रिटीज सामील होणार असल्याची चर्चा आहे. २८ जुलैला सुरु होणाऱ्या नव्या पर्वात सामील होणाऱ्या नव्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार.

नुकतीच कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या रीलमध्ये 'दोस्तीच्या दुनियेतील यार, एक नंबर कलाकार कोण आहे हा?' असं लिहिण्यात आलं आहे.यावरून दुनियादारी सिनेमातील एक कलाकार सामील होणार असल्याचं म्हंटल जातंय. या आधी अभिनेता सुशांत शेलारने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता. सुशांतची दुनियादारी सिनेमातील भूमिकाही खूप गाजली होती.  

या पोस्टमुळे दुनियादारी सिनेमात काम करणाऱ्या अनेक कलाकारांची नाव समोर आली आहेत. अभिनेता योगेश शिरसाट, राजेश भोसले, प्रणव रावराणे या कलाकारांची नावं समोर आली आहेत. याशिवाय मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीचा कलाकारही बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचं म्हंटलं जातंय. राजश्री मराठीने चॅनेलने एक पोस्ट शेअर केली होती त्याला 'रांगडा गडी' असं कॅप्शन दिलं होतं. यावरून बिग बॉस मराठीच्या घरात हार्दिक जोशी जाणार असल्याचं म्हंटलं जातंय.

हार्दिक बरोबरच अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, विवेक सांगळे, चेतन वढनेरे या कलाकारांची नावंही समोर आली आहेत. पण यांच्यापैकी नक्की कोण बिग बॉस मराठीच्या घरात असणार हे २८ जुलैला पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियरमध्येच समजेल. रितेश देशमुख यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे.

दरम्यान, हार्दिकने अखेरचं झी मराठीवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम केलं होतं. तर 'जाऊ बाई गावात' या रियालिटी शोचं सूत्रसंचालन केलं होतं. या शिवाय 'तुझ्यात जीव रंगला' ही त्याची मालिका गाजली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT