Nagarjuna Akkineni Esakal
Premier

Viral Video : 'त्या' ट्रोलिंगनंतर नागार्जुन यांनी चाहत्याची भेट घेत मागितली माफी ; नेटकरी म्हणाले...

Nagarjuna meet his fan : एअरपोर्टवर बॉडीगार्डने गैरवर्तणूक केलेल्या दिव्यांग चाहत्याची भेट घेत नागार्जुन यांनी त्याची माफी मागितली.

सकाळ डिजिटल टीम

Nagarjun : साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीचे अभिनेते नागार्जुन (Nagarjuna Akkineni) सध्या एअरपोर्टवर घडलेल्या घटनेमुळे चर्चेत आले आहेत. एअरपोर्टवरून बाहेर पडताना त्यांच्या बॉडीगार्डने एका दिव्यांग चाहत्याला ढकलल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नागार्जुन यांना ट्रोल केलं. ही घटना समजल्यानंतर नागार्जुन यांनी त्या चाहत्याची भेट घेत त्याची माफी मागितली.

काय घडलं नेमकं ?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यात पहायला मिळालं कि, नागार्जुन (Nagarjuna Akkineni )एअरपोर्टवरून बाहेर पडत असताना एक दिव्यांग चाहता त्यांना भेटायला येतो. तो त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा बॉडीगार्ड त्याला बाजूला ढकलतो आणि या सगळ्या प्रकाराकडे नागार्जुन (Nagarjuna Akkineni) यांनी लक्ष दिलं नाही. त्यांच्या मागे धनुष (Dhanush) आणि त्याचा मुलगाही चालत असल्याचा पाहायला मिळालं. अनेकांनी या घटनेमुळे नागार्जुन यांना ट्रोल केलं.

नागार्जुन यांनी मागितली माफी

या घटनेनंतर नागार्जुन (Nagarjuna Akkineni) यांनी सोशल मीडियावर त्या चाहत्याची माफी मागितली.  “हे नुकतंच माझ्या निदर्शनास आलं. असं घडायला नको होतं. मी त्या गृहस्थाची माफी मागतो आणि भविष्यात असं होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेईन.” अशी एक्स या सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर ट्विट करत त्यांनी माफी मागितली. पण तरीही नेटकऱ्यांचा राग शांत झाला नाही. त्यांना ट्रोल करणं सुरुच ठेवलं.

दिव्यांग चाहत्याची भेट

काही काळाने नागार्जुन (Nagarjuna Akkineni) यांनी त्यांच्या या दिव्यांग चाहत्यांची एअरपोर्टवर जाऊन स्वतःहून भेट घेतली. त्याची माफी मागितली आणि "ही तुमची चूक नाही " असंही त्यांनी यावेळी चाहत्याला सांगितलं. त्यानंतर त्यांनी चाहत्याला मिठीही मारली. उपस्थित पापाराझींनी त्यांचे फोटो काढले. सोशल मीडियावर हा व्हिडिओही चर्चेत आला. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत नागार्जुन 'जमिनीवर राहणारे सेलिब्रिटी आहेत, ते खूप नम्र आहेत' असं म्हंटलं तर काहींनी 'ही सोशल मीडियाची ताकद आहे' अशी कमेंट केली.

सोशल मीडियावर हा व्हिडिओही व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना अखेर दिलासा! आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, उकाड्यापासून मिळणार आराम

2027 मध्ये प्रभासचे 'हे' बिग बजेट प्रोजेक्ट होणार रिलीज !

Chess Grandmaster Bobby Fischer Historic Match : खेळ की शास्त्र? अमेरिकेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जेव्हा बॉबी फिशरने रशियाला नमवले!

Tanzania: टांझानिया : पूर्व आफ्रिकेतील नैसर्गिक संपत्तीचा महासाथी

Monsoon Update India : मॉन्सून वेगाने पुढे सरकतोय ! केरळमध्ये पुढील दोन दिवसांत होणार दाखल, महाराष्ट्र आगमन कधी ? अपडेट समोर

SCROLL FOR NEXT