Janhvi Kapoor Esakal
Premier

Janhvi Kapoor : "काही लोकांच्या नशिबात नसतं..."; जेव्हा बोनी यांना टीचरने जान्हवीचं गाणं शिकणं बंद करायला लावलं

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या सिंगिंग टॅलेंटबद्दल भन्नाट किस्सा शेअर केला. काय म्हणाली जान्हवी जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या खूप चर्चेत आहे. मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये ती सध्या बिझी असून तिने दिलेल्या मुलाखतींनी सगळ्यांचीच मन जिंकली आहे. नुकतंच तिची एक मुलखात चर्चेत आहेत ज्यात ती गाणं का नाही शिकली याचा खुलासा केला आहे.

गाण्याचा क्लास आणि नेपोटीझम

जान्हवीने नुकतीच प्रोमोशन निमित्ताने रेडिओ मिरचीला मुलाखत दिली. तेव्हा तिला तिने गाणं शिकणं का सोडलं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जान्हवी म्हणाली कि,"माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मला गाणं शिकायला पाठवण्यात आलं होतं. तेव्हा काही काळानंतर माझ्या टीचरने वडिलांना सांगितलं कि, काही लोकांसाठी ही कला नसते तेव्हा सोडून द्या. त्यानंतर माझं गाणं शिकणं बंद झालं."

पुढे ती म्हणाली कि, "शाळेतही जेव्हा समूह गायनाचा कार्यक्रम असायचा तेव्हा प्रत्येकासमोर माईक ठेवलेले असायचे. मी पाहिलं आहे कि टीचरने माझ्या समोरचा माईक ऑफ करायला सांगितला होता. त्यांनी मला त्या कार्यक्रमात घ्यायचं कारणच नेपोटीझम होतं." तिने असं म्हंटल्यावर राजकुमार आणि शोची होस्ट हसायला लागले.

सोशल मीडियावर जान्हवीने सांगितलेला हा किस्सा चर्चेत असून अनेकांनी कमेंट्स करत तिच्या सेन्स ऑफ ह्युमरचं कौतुक केलं आहे. ती इतकी प्रभावी आहे आणि इतकी हुशार आहे हे माहित नसल्याचं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हंटल.

मिस्टर आणि मिसेस माहीची चर्चा

दरम्यान, ३१ मे २०२४ ला जान्हवी आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला मिस्टर अँड मिसेस माही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एक अपयशी क्रिकेटर असलेल्या महेंद्रला त्याच्या बायकोमध्ये क्रिकेट टॅलेंट असल्याचं जाणवतं आणि तो तिला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न पाहतो. या स्वप्नात तो यशस्वी होतो का? पुढे काय घडतं? याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

शरण शर्मा याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT