Premier

Zee Marathi New Serial : 'ही' अभिनेत्री साकारणार सावळ्याची जणू सावली मालिकेत मुख्य भूमिका, प्रोमोने वेधलं लक्ष

Zee Marathi New Serial Update : झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या सावळ्याची जणू सावळी या मालिकेतून मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Entertainment News : सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'झी मराठी‘ वाहिनीवर सावळ्याची जणू सावळी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचं मोशन पोस्टर रिलीज करत या मालिकेची घोषणा केली. या मालिकेत कोण अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे नुकतंच रिव्हील करण्यात आलं.

महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये नदीतून हंड्यात पाणी भरून विठ्ठलाच्या मंदिरात गाणं गात जाणारी तरुणी दिसतेय. सगळेजण तिच्या आवाजाचं कौतुक करताना दिसत आहेत. पण यावेळी एक आजोबा म्हणतात कि, "एवढा गोड आवाज आहे पण दिसायलाही एवढी गोड असती तर." त्यानंतर केसात गजरा माळलेली एक सावळी मुलगी विठ्ठलाची पूजा करताना दिसते.

अभिनेत्री प्राप्ती रेडकर ही मुख्य भूमिका साकारणार आहे. या आधी प्राप्तीने कलर्स मराठीवरील 'काव्यांजली' ही मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तिने साकारलेली अंजलीची भूमिका सगळ्यांना आवडली. प्राप्तीने बालकलाकार म्हणून मराठी अभिनयविश्वात पदार्पण केलं. "किती सांगायचंय मला" या कलर्स मराठीवरील मालिकेत तिने काम केलं होत. त्यानंतर तिने 'मेरे साई' या मालिकेत काम केलं होतं.

ही मालिका कधी सुरु होणार हे अजून चॅनेलने जाहीर केलेलं नाहीये. या मालिकेत अजून कोण कलाकार असणार हे रिव्हील करण्यात आलं नाहीये. ही मालिका 'कृष्णकोली' या बंगाली मालिकेवर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पर्वती येथील शाहू वसाहत एसआरए प्रकल्पावरील सुनावणी आज; नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बारामतीत कारची वारकऱ्याला धडक, अपघातात वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू

Nagpur Tiger Census: आनंदाची बातमी! नागपूरच्या जंगलात वाघांची डरकाळी; पहिल्याच अधिकृत गणनेत 42 ते 45 वाघांची नोंद

SCROLL FOR NEXT