Rashmika Mandana Esakal
Premier

Viral Video : डोक्यावर चक्क नारळ ठेवून 'पुष्पा' फेम अभिनेत्रीने केला स्टंट.. चाहतेही झाले अवाक

Rashmika Mandana Viral Video : अभिनेत्री रश्मिका मंदानाने केलेल्या स्टंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rashmika Mandana : सोशल मिडीयावर एखाद्या प्रसिद्ध कलाकाराने हटके व्हिडीओ पोस्ट केला की तो व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आहे लोकप्रिय दाक्षिणात्य पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा. रश्मिकाने नुकतच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत रश्मिका डोक्यावर शहाळ घेऊन तोल सांभाळत डान्स करताना दिसतेय.

'अॅनिमल' या रणबीर कपूरच्या चित्रपटातील 'जमाल कुडू' हे बॉबी देओलचं गाणं लोकप्रिय झालं होतं. या गाण्यात बॉबी देओल डोक्यावर दारुचा ग्लास घेऊन तोल सांभाळत डान्स करताना दिसला होता. बॉबीची ही डान्स स्टेप आणि गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आणि ट्रेंडिंगमध्ये आलं होतं. सोशल मिडीयावर या गाण्यावर अनेकांनी रील्स व्हिडीओ देखील केले होते. रश्मिका देखील अॅनिमल चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. रश्मिकाला देखील या लोकप्रिय गाण्यावर व्हिडीओ करण्याचा मोह आवरता आला नाही. मग तिनेही बॉबी देओलची ही डान्स स्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी ग्लासच्या ऐवजी रश्मिकाने चक्क शहाळे डोक्यावर ठेवले. डोक्यावर ठेवलेल्या शहाळ्याचा तोलही तिने उत्तम सांभाळला आणि जमाल कुडू गाण्याप्रमाणे डान्स करण्याचा प्रयत्न केला. शहाळे डोक्यावर ठेवून रश्मिकाने डान्स करायचा प्रयत्न तर केला मात्र शहाळ्याच्या वजनाचा तोल सांभाळत केलेलं धाडस पाहुन चाहतेही प्रभावित झालेत. रश्मिकाच्या चाहत्यांनी या व्हिडीओचं चांगलच कौतुक केलय. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

रश्मिका ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलय. 'पुष्पा' चित्रपटातील श्रीवल्ली ही तिची भूमिका प्रचंड गाजली, शिवाय 'श्रीवल्ली' गाणंही चर्चेत आलं होतं. शिवाय 'पुष्पा' सिनेमातील अल्लू अर्जुन सोबतचं तिचं 'सामी' हे गाणं ही लोकप्रिय आहे. आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या 'पुष्पा २' मध्ये देखील 'सामी' हे गाणं वेगळ्या अंदाजात पाहायला मिळतय. हे गाणं देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात गाजतय. पुष्पा चित्रपटातील साऊथ स्टार अल्लू अर्जुन सोबतची रश्मिकाची जोडी मोठया प्रमाणात पसंत केली गेली. तेव्हा 'पुष्पा २' मध्ये देखील दोघांची केमिस्ट्री कमाल करणार यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

IND vs JPN: भारत-जपानचा T20 सामना कुठे पाहता येणार? मीडिया राइट्समध्ये मोठा पेच; नेमकं काय झालं?

Marathi News Live Updates: पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT