Actress Shivani Sonar eSakal
Premier

Shivani Sonar Engagement : शिवानी-अंबरने गुपचूप उरकला साखरपुडा; शिवानीच्या खास अंगठीने वेधलं लक्ष

Ambar Ganpule Engagement : शिवानी आणि अंबरने काल म्हणजे 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा केला. शिवानी मित्रपरिवाराने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच ही बातमी सगळ्यांना समजली.

सकाळ डिजिटल टीम

Shivani Sonar Ambar Ganpule Engagement : कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनारने अभिनेता अंबर गणपुलेशी गुपचूप साखरपुडा उरकला. सोशल मीडियावर यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

शिवानी आणि अंबरने काल म्हणजे 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा केला. शिवानी मित्रपरिवाराने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच ही बातमी सगळ्यांना समजली. या साखरपुड्याला शिवानीचे कुटूंबीय आणि काही मित्रमंडळी उपस्थित होते.

शिवानीने पेस्टल गोल्डन रंगाचा लेहेंगा घातला होता, सोबत गळ्यात हिरव्या रंगाचा डिझायनर मनीष मल्होत्राच्या ज्वेलरीसारखी डिझाइन असलेला नेकलेस, सिम्पल कर्ल्स, मिनिमम मेकअप असा लूक तिने केला होता. तर अंबरने जांभळ्या रंगाची शेरवानी घातली होती. अनेकांना त्यांचा लूक पसंत पडला.

शिवानीच्या अंगठीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. एक मोठा सिंगल डायमंड आणि त्याच्या बाजूला छोट्या डायमंड्सची नक्षी असलेली ही अंगठी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. तर अंबरच्या बोटातील गोल्ड बँड पद्धतीची अंगठीही सगळ्यांना आवडली. सोशल मीडियावर फोटोज शेअर होताच अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्या दोघांचही अभिनंदन केलं.

वर्क फ्रंट

शिवानी सध्या 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेत तिने साकारलेली सिंधुताई सपकाळ यांची व्यक्तिरेखा सगळ्यांनाच पसंत पडली आहे. तर अंबरने स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम केलं होतं. अनेकांना त्याची या मालिकेतील भूमिका आवडली होती. त्यानंतर त्याने झी मराठीवरील 'लोकमान्य' या मालिकेतही काम केलं होतं. या मालिकेत त्याने साकारलेले समाजसुधारक आगरकर ही भूमिकाही अनेकांना आवडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT