Bigg Boss Marathi Season 5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : बॉलिवूड गाजवणारी सुपरस्टार अभिनेत्री येणार बिग बॉस मराठीच्या घरात ? नुकताच घेतला प्रसिद्ध मालिकेतून निरोप

Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यावेळी घरात कोणते सेलिब्रिटीज स्पर्धक म्हणून प्रवेश करणार जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Colors Marathi : बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आधीचे चारही सीजन गाजवलेल्या या रियालिटी शोची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगलीये आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये काही सेलिब्रिटीच्या नावांची चर्चाही आहे. यातच आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे.

'बिग बॉस मराठी अपडेट्स_5' या इन्स्टाग्राम पेजवर याविषयीच एक अपडेट शेअर करण्यात आलं. बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उसगावकर प्रवेश करणार असल्याचं म्हंटलं जातंय. वर्षा यांनी नुकतीच स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोडली या मालिकेचा साकारत असलेलं माई हे पात्र खुप गाजलं होत. त्यामुळे आता वर्षा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलीये.

वर्षा यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. मराठी सिनेमात त्या बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या तर बॉलिवूडमध्येही त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. गेल्या काही काळापासून त्यांनी मराठी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. सुखं म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत त्यांनी साकारलेली माईची भूमिका गाजली. आता या मालिकेत माईंचा शालिनीने खून केल्याचं दाखवण्यात आलं आहे. यातच माईंचा मृत्यू होतो असं दाखवण्यात आलं आहे.

वर्षा यांच्याबरोबरच जान्हवी किल्लेकर, विवेक सांगळे, चेतन वढनेरे आणि अंकिता वालावलकर हे सेलिब्रिटी बिग बॉस मध्ये सहभागी होणार असल्याचं म्हंटलं जातंय. पण याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २८ जुलै पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. २८ जुलै २०२८ ला रात्री ९:३० वाजता बिग बॉस मराठीचा दिमाखदार प्रीमियर पार पडणार आहे.

यंदा या शोचं सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार असून जिओ सिनेमा आणि कलर्स मराठीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; सरकारच्या कामकाजावर ठेवणार बारीक नजर

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Delhi Police Officer Resignation :'जंतर-मंतरवरील पोरांना मारू शकत नाही'; दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा? व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT