Aishwarya narkar And Avinash narkar sakal
Premier

VIDEO: "कहते हैं जोड़ियां ऊपर से बनकर आती है..."; ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

Aishwarya narkar And Avinash Narkar: ऐश्वर्या आणि अविनाश यांनी नुकताच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

priyanka kulkarni

Aishwarya And Avinash Narkar Comedy Video: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या डान्सच्या रिल्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तसेच ऐश्वर्या आणि अविनाश हे कॉमेडी व्हिडीओ शेअर करुन देखील नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात. अशातच ऐश्वर्या आणि अविनाश यांनी नुकताच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अविनाश हे मजेशीर डायलॉग म्हणताना दिसत आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश यांचा मजेशीर व्हिडीओ

ऐश्वर्या आणि अविनाश यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ऐश्वर्या ही मोबाईलवर काहीतरी बघत आहे. तेवढ्यात अविनाश हे डायलॉग म्हणतात, "कहते हैं जोड़ियां ऊपर से बनकर आती है, मतलब काम ऊपर भी सही नहीं हो रहा"

ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या या कॉमेडी व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. एका नेटकऱ्यानं त्यांच्या या व्हिडीओला कमेंट केली, "तुमची जोडी खूप भारी आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "लाखात एक आहात तुम्ही"

पाहा व्हिडीओ:

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. सध्या ऐश्वर्या ही सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अनेक ट्वीस्ट अँड टर्न येत असतात. तसेच यांचा स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अविनाश आणि ऐश्वर्या हे दोघे त्यांच्या सोशल मीडियावरील रिल्समुळे चर्चेत असतात. वेगवेगळ्या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ ते शेअर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT