Aishwarya narkar  saka
Premier

लेका लाज तुला वाटली पाहिजे... अविनाश नारकरांना ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या यांचं सडेतोड उत्तर, अकाउंटही केलं शेअर

Aishwarya Narkar Reply To Trollers: लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या एका रीलवर आलेल्या निगेटिव्ह कमेंटवर त्यांनी युझर्सना चांगलंच सुनावलं आहे

Payal Naik

लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे दोघेही कायम सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेकदा नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसतात. मात्र त्यांनाही ते दोघे पुरून उरतात. अशा ट्रोलर्सना ते दोघेही त्यांच्याच भाषेत उत्तर देताना दिसतात. आताही अशाच काही ट्रोलर्सना ऐश्वर्या यांनी खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी त्याचे स्क्रिनशॉट चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Aishwarya Narkar

अविनाश आणि ऐश्वर्या यांनी एक रील शेअर केली होती. त्यानंतर त्यावर काही युझर्स अविनाश यांच्यावर वाईट कमेंट करताना दिसून आले. मात्र यांना ऐश्वर्या यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे. एका युझरने त्यांना ट्रोल करत लिहिलं, 'खूप किळसवाणे भाव आहेत.' त्यावर उत्तर देत ऐश्वर्या यांनी लिहिलं, 'देशपांडे, आपल्या विचारांमध्ये किळसवाणी वृत्ती आहे, चांगले विचार करा.'

Aishwarya Narkar

आणखी एकाने लिहिलं, 'दोघेही एकत्र बरे दिसत आहात पण श्रीयुत नारकर यांनी तोंडाचे आचरट भाव केले नाहीत तर खूप सुसह्य होईल.' त्यावर उत्तर देत ऐश्वर्या यांनी लिहिलं, 'जोशी अनफॉलो केलंत तर फार सुसह्य होईल. इथे खूप चांगले लोक आहेत. तुम्ही नाही त्यात शोभत.'

Aishwarya Narkar

आणखी एका युझरने लिहिलं, 'बघ आता आजोबा लका स्वतःला लाज वाटली पाहिजे, काय करतो आजोबा लका तू.' त्यावर ऐश्वर्या याची सडेतोड उत्तर देत लिहिलं, 'लेका झिरो पोस्ट तुझ्या... लाज तुला वाटायला हवी.' यासोबतच ऐश्वर्या यांनी त्यांची एक रील शेअर केली होती ज्यात त्या साडीत अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यावर एका युझरने कमेंट करत लिहिलं, 'काय हे कोणासाठी नवरा आहे ना.' त्यावर ऐश्वर्या यांनी लिहिलं, 'डोक्यावर पडलायस का बाबा?' ऐश्वर्या या नेहमीच अशा युझर्सना धडा शिकवताना दिसतात. तर त्या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत विरोचकाच्या भूमिकेत दिसतायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT