amruta khanvilkar  sakal
Premier

कुठलाही अटॅक, त्रास नसलेल्या अमृता खानविलकरच्या आईची झाली ओपन हार्ट सर्जरी; अभिनेत्रीने केलं भावनिक आवाहन

Amruta Khanvilkar Mother Health Issue: लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या आईच्या सर्जरीविषयी माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. तिने आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावर सगळ्यांना भुरळ पाडली. प्रेक्षकांची लाडकी चंद्रा ही बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवताना दिसतेय. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच तिने केलेल्या एका पोस्टमुळे आता चाहतेही चकीत झाले आहेत. अमृताच्या आईवर ५ जुलै रोजी ओपन हार्ट सर्जरी पार पडली. देवाची कृपा होती म्हणून हे आधीच कळालं असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोबतच तिने प्रेक्षकांना मोलाचा सल्लाही दिला आहे.

अमृताने पोस्ट करत लिहिलं, ' गुरु म्हणजे पाठीशी उभा राहणारा, गुरु म्हणजे वाट दाखवणारा, आपल्यावर येणारं संकट झेलण्याची ताकत देणारा आणि हे सगळं….. न मागता देणारा म्हणजे गुरु. गेले दोन महिने माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते ... माझी आई हिची ५ तारखेला ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली.... तिला कुठल्याही प्रकारचा अटॅक किंव्हा कसला ही जीवघेणा त्रास झाला नाही... मम्माची कंडिशन आम्हाला डिटेक्ट करता आली आणि त्यावर योग्य तो उपचार करता आला ह्यात फक्त आणि फक्त स्वामींची कृपा होती.'

तिने तिथल्या डॉक्टरांचे आभार मानले. अमृताने पुढे लिहिलं, 'आयुष्य हादरवून टाकणाऱ्या अशाच काही घटनांमध्ये आपल्याला विश्वास सापडतो आणि माझंही तेच झालं. मी माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबाचे आभार मानू इच्छिते ज्यांनी सावलीप्रमाणे माझी साथ दिली, मला मिठी मारली, मला खाऊ घातलं, मला सांभाळलं... तुम्ही माझे देवदूत आहात आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. 'आई आता बरी होत आहे आणि प्रत्येक स्त्री आयरन लेडी आहे हे तिने खऱ्या अर्थाने दाखवून दिलं. श्री स्वामी समर्थ. मम्मा माझे तुझ्यावर प्रेम आहे.'

यासोबत शेवटी तिने सर्वांना आवाहन करत लिहिलं, 'ही घटना घडल्यानंतर सर्व मुलं आणि पालकांना सांगू इच्छिते की, कृपया तुमच्या कुटुंबातील कोणालाही किंवा त्यांच्या आरोग्याला गृहीत धरू नका, ३ वर्षांपूर्वी मी माझ्या अशाच एका महत्त्वाच्या व्यक्तीला गमावलंय. माझ्या आईला कधी अर्धा दिवसही रुग्णालयात दाखल केलं नव्हतं, तिला आतापर्यंत कोणतीही आरोग्याची समस्या आली नव्हती आणि तिची एवढी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे कृपया नियमित तपासणी करून घ्या, कृपया आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगलुरु महामार्गावर नवीन कात्र बोगद्याजवळील दरी पुलाजवळ कंटनेर आणि चार वाहनांचा भीषण अपघात

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT