Amruta Khanvilkar sakal
Premier

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

Social Media: अमृतानं शेअर केलेल्या लंडन ट्रीपच्या फोटोवर तिच्या एका चाहतीनं कमेंट करुन अमृताचा पती हिमांशूबद्दल विचारलं.

priyanka kulkarni

Amruta Khanvilkar Comment: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. अमृता ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. अमृता सध्या तिच्या आई-वडिलांसोबत लंडन ट्रीप एन्जॉय करत आहे. या ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशातच आता अमृतानं शेअर केलेल्या लंडन ट्रीपच्या फोटोवर तिच्या एका चाहतीनं कमेंट करुन अमृताचा पती हिमांशूबद्दल विचारलं. अमृतानं चाहतीच्या या कमेंटला रिप्लाय दिला आहे.

अमृताच्या चाहतीची कमेंट

अमृताच्या लंडन ट्रीपच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “हिमांशूबरोबर तू का फिरत नाहीस? आम्ही तुम्हाला एकत्र फिरताना खूप कमी वेळा पाहतो. नेहमी तू तुझी आई किंवा बहिणीबरोबर फिरायला जाते पण, तुझा नवऱ्यासोबत तू फिरायला का जात नाही.”

अमृताचा रिप्लाय

अमृतानं चाहतीच्या कमेंटला रिप्लाय दिला, “खरं सांगायचं झालं, तर हिमांशू हा इन्स्टाग्राम जास्त वापरत नाही. त्याचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे पण, तो त्या अकाऊंटवर काहीच शेअर करत नाही, तो कोणालाच फॉलो करत नाही. त्यामुळे एकत्र फोटो टाकायचा प्रश्नच येत नाही. आमच्या आयुष्यातील काही गोष्टी आम्हाला प्रायव्हेट ठेवायला आवडतात."

Amruta Khanvilkar

त्यानंतर अमृताच्या चाहतीनं कमेंट केली, "पण प्लिज काही वेळा तुम्ही एकत्र फोटो पोस्ट करत जा, मी नच बलिए या कार्यक्रमापासून तुमची चाहती आहे. त्या कार्यक्रमात तुम्ही दोघे विजेते ठरला होता. मी तुम्हा दोघांना मिस करते, त्यामुळे प्लिज तुम्ही पोस्ट करा" यावर अमृतानं 'नक्की' असा रिप्लाय दिला.

अमृता आणि हिमांशू यांनी  2015 मध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांनी नच बलिए या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT