anant ambani radhika merchant wedding 2 arrested for gatecrash mumbai jio convention centre  
Premier

Ambani Wedding : अंबानीच्या लग्नात 'बिन बुलाए' घुसला युट्यूबर; मुंबई पोलिसांनी केला पाहुणचार

Ambani Wedding Guest List : मीडिया रिपोर्टनुसार, आरोपींविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघेही आंध्र प्रदेशमधून मुंबईत आले होते.

रोहित कणसे

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची जगभरात चर्चा झाली. या लग्नसोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान या लग्नात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, हे दोघे निमंत्रण नसताना लग्न सोहळ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यापैकी पहिल्या आरोपीचं नाव व्यंकटेश नरसैया असून तो २६ वर्षीय यूट्यूबर आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव लुकम मोहम्मद शफी शेख असून त्याचं वय २८ वर्ष आहे. शेख याने सांगितलं की तो एक बिझनेसमन आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपींविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघेही आंध्र प्रदेशमधून मुंबईत आले होते. हे दोघे विशेषतः हायप्रोफाइल लग्नसोहळा पाहायला आले होते.

अंबानी कुटुंबातील हे भव्य लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आला होते. व्यंकटेश आणि लुकम देखील येथे पोहचले होते. आरोप आहे की व्यंकटेश अंनत अंबानी यांच्या लग्नस्थळाच्या फर्स्ट फ्लोरवर फिरत होता. तर लुकुमला गेट क्रमांक २३ वर थांबवण्यात आले. त्याच्याकडे आत जाण्यासाठी 'पास' नव्हता. त्यामुळे त्याला तेथून जाण्यास सांगण्यात आले. असे असतानाही तो कसा तरी आत गेला, असे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला संशयाच्या आधारे थांबवून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला बीकेसी पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन आणि कायदेशीर कारवाई केल्यानंतर सोडून दिले.

मुंबईत १२ ते १३ जुलैपर्यंत चाललेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट य़ांच्या लग्नाचा सोहळा चालाल. यासोबतच त्यांचे कितीतरी महिन्यांपासून सुरू असलेले प्रीवेडिंग संपला. या लग्नसोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आले होते. त्यांच्यासोबतच शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, रणवीर सिंह तसेच इतरही अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Aaghadi: इंडिया आघाडीचं ठरलं! भाजपविरोधात 'हा' प्लॅन रेडी; उद्धव ठाकरेंचा मात्र वेगळाच सूर, भर बैठकीत सुनावलं...

Donald Trump: ''तात्काळ हल्ले थांबवा, नाहीतर...'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण-इस्रायलला इशारा; पुढच्या दोन दिवसात सगळं थांबणार?

Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका! केंद्र सरकारने सबसिडीच्या सिलिंडरची संख्या घटवली; आता किती मिळणार?

Rave Party Case : रेव्ह पार्टी प्रकरण! तुळापुरातील फार्महाऊस सील; शिवराज्याभिषेक दिनीच पार्टी झाल्याने ग्रामस्थांचा संताप

IND A Tri-Series: वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, भारतीय अ संघ श्रीलंकेत खेळणार वनडे तिरंगी मालिका! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने?

SCROLL FOR NEXT