anurag kashyap  sakal
Premier

मला ती नकोच... मॅनेजरचा आगाऊपणा मराठी अभिनेत्रीला नडला; अनुराग कश्यपने थेट सिनेमातूनच काढलं, नेमकं काय घडलं?

Anurag Kashyap: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या मॅनेजरने केलेल्या त्या गोष्टीमुळे तिच्या हातून एक चांगला सिनेमा गेला असता.

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आपल्या चित्रपटांच्या जोरावर प्रेक्षकांना चित्रपटगृहात येण्यास भाग पाडलं. तो बॉलिवूडमधील नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याचे 'ब्लॅक फ्रायडे', 'नो स्मोकींग', 'देव डी', 'गुलाल', 'दॅट गर्ल ईन यलो बुट्स' आणि 'गॅंग्स ऑफ वासेपूर' हे चित्रपट हिट ठरले. त्याच्या वेबसिरीजचीदेखील प्रेक्षकांमध्ये चर्चा असते.

अशातच आता त्याची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय ज्यात तो एका मराठी अभिनेत्रीबद्दल बोलताना दिसतोय. या अभिनेत्रीच्या आगाऊ मॅनेजरमुळे अनुरागने तिला जवळजवळ सिनेमातून काढलं होतं. कोण होती ती अभिनेत्री? नेमकं काय घडलेलं.

अनुरागने नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, 'आधीची बॉलिवूडची परिस्थिती वेगळी होती. आता सगळ्यांना बॉलिवूडमधून पैसे कमावणं सोपं वाटतं. एका चित्रपटाची निर्मिती करून आपण बक्कळ पैसे कमावू असं वाटतं.

पण तसं नाहीये. तर कलाकारांच्या मागण्याही वाढल्यात. मी एक चित्रपट करत होतो. त्यात मला त्या अभिनेत्रीला घ्यायचं होतं जिच्यासोबत मी आधी तीनवेळा काम केलंय. ही अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. पण तिच्या मॅनेजरकडून मला एक भलीमोठी मागण्यांची यादी पाठवण्यात आली. सिंगल डोअर व्हॅनिटी व्हॅन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मी म्हटलं काय पागल झालाय का?

पुढे अनुराग म्हणाला, 'मी सरळ मॅनेजरला फोन केला आणि सांगितलं मी अमृताला रिप्लेस करतोय. मला ती नकोय. मी दुसरी अभिनेत्री बघेन. थँक यू. नंतर अमृताने स्वतः मला फोन केला आणि विचारलं काय झालं, मी काय केलंय? तिला स्वतःला माहीत नव्हतं तिच्या मॅनेजरने काय काय मागण्या केल्यात. ती तिच्या मॅनेजरला खूप ओरडली. माझ्यावतीने हे सगळं सांगायची तुझी हिंमत कशी झाली.' हे एकदा नाही असं अनेक कलाकारांच्या बाबतीत घडलंय. पण अशा कलाकारांना मी सरळ माझ्या चित्रपटातून काढून टाकतो.' अनुरागची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT