Malaika Arora esakal
Premier

Malaika Arora: "आई तू लग्न कधी करणार?"; लेकाचा प्रश्न, मलायकाच्या उत्तरानं वेधलं लक्ष

Malaika Arora: पॉडकास्टच्या प्रोमोमध्ये अरहान हा मलायकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा मुलगा अरहान खान (Arhaan khan) याचे 'डंब बिर्याणी' नावाचे पॉडकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अरबाज खान आणि सोहेल खान यांनी या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. आता मलायका देखील तिच्या मुलाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आहे. या पॉडकास्टच्या प्रोमोमध्ये अरहान हा मलायकाला लग्नाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. तर मलायका देखील अरहानला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारताना दिसत आहे.

अरहानच्या प्रश्नाला मलायकानं दिलं हटके उत्तर

पॉडकास्टच्या प्रोमोमध्ये दिसते की, अरहान मलायकाला विचारतो, "तू सोशल क्लांबर आहेस?" मलायका याचं उत्तर देते, "मी नाहीये." त्यानंतर अरहा मलाइकाला विचारतो, "आई, तू लग्नकधी करणार" या प्रश्नाचे मलायकाने उत्तर दिले, तुला याचं खरं उत्तर पाहिजे? मी याचं खूप स्पायसी उत्तर देऊ शकते." मलायकाच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मलायकानं लेकाला व्हर्जिनीटीबद्दल विचारलं

प्रोमोमध्ये दिसते की मलायका तिच्या मुलाला व्हर्जिनीटीबद्दल देखील विचारते. आईचा हा प्रश्न ऐकल्यानंतर अरहान आश्चर्यचकित होतो.

अरहानच्या 'डंब बिर्याणी' या पॉडकास्टच्या गेल्या एपिसोडमध्ये अभिनेता अरबाज खान आणि सोहेल खान यांनी सलमान खानसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. अरबाजने मस्करी करत म्हणाला की, आम्ही तिघेही भाऊ खरतंर एकमेकांच्या बहिणीसारखे आहोत. त्यावर अरहान मजेत म्हणतो, 'भाईजान नहीं, बहनजी.'

मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. अरबाजनं गेल्या वर्षी शुरा खान या मेकअप आर्टिस्टसोबत लग्न केलं आहे. अरबाज आणि शूराच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मलायका ही सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन हे एकमेकांसोबत कधी लग्न करणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT