Zee Marathi New serial sakal
Premier

Zee Marathi New serial : आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘सावळ्याची जणू सावली’ची घोषणा

Zee Marathi New serial : झी मराठीने विठ्ठल भक्तीवर आधारित नवीन मालिकेचा टीझर रिलीज केला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला.

सकाळ वृत्तसेवा

Zee Marathi New serial : सध्या विविध टीव्ही चॅनेल्सवर नवीन मालिका येत आहेत आणि टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने झी मराठीने त्यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेचा पहिला लूक आता प्रेक्षकांसमोर आला आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ असं या मालिकेचं नाव आहे. मागील काही महिन्यांमध्ये झी मराठीने अनेक नवीन मालिका लाँच केल्या. त्यातील ‘शिवा’, ‘पारू’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका विठ्ठल भक्तीवर आधारित आहे.

टीझरमध्ये एक मुलगी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन भक्तिभावाने आराधना करत असल्याचं दाखवलं आहे. या व्हिडीओसोबत ‘पांडुरंगाची परमभक्त ती, सुरेल तिचा गळा, तुम्हालाही लागेल तिच्या गोड आवाजाचा लळा, सावळ्याची जणू सावली ही नवीन मालिका येतेय लवकरच आपल्या भेटीला’ अशी कॅप्शन दिली आहे.

ही मालिका कधी सुरू होईल, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मालिकेची घोषणा झाली असली तरी झी मराठीवर या मालिकेला कोणता वेळ दिला जाईल, याची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drunk Driving Law : केवळ तोंडातून दारुचा वास आला म्हणजे ड्रायव्हर नशेत आहे, असं मानता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Latur News: लातूर हादरले! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड कारमध्ये मृतावस्थेत; औषधांच्या बाटल्या, सिरिंज अन्..नेमकं काय कारण?

Latest Marathi News Live Update : कणबर्गीतील १६० एकर भूसंपादनावर आक्षेप; जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार, जिल्हाधिकारी घेणार बैठक

IND vs ENG, 2nd ODI: गिलची तंदुरुस्ती अन् रोहितच्या फॉर्मवर लक्ष; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज रंगणार

Lanja Road Accident : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! गोव्याहून फिरून येताना मुंबईच्या नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला; कार डंपरवर आदळून चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT