akshay kelkar sakal
Premier

Akshay Kelkar: म्हाडाची लागली लॉटरी अन् नव्या घराची केली 'पंढरी'...

The house has been beautifully decorated by Akshay: आषाढी एकादशीनिमित्ताने त्याने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akshay Kelkar: गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांनी नवीन घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. याच यादीत आता ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिनेता अक्षय केळकरचेदेखील नाव जोडले गेले आहे. अक्षय केळकरने गेल्यावर्षी म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पासाठी अर्ज केला होता. या सोडतीमध्ये अक्षय विजेता ठरला आणि त्याला हक्काचं घर मिळालं.

हे घर अक्षयने अतिशय सुंदररीत्या सजवलं आहे. याची झलक अभिनेत्याने यापूर्वीदेखील शेअर केली होती, परंतु या नव्या घरात त्याने वारकऱ्यांच्या प्रतिकृती घडवल्या आहेत. याची झलक आषाढी एकादशीनिमित्ताने त्याने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अक्षयने पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी, वारीत सहभागी झालेली लहान मुलं अशा विविध प्रतिकृती घडवल्या आहेत. यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अक्षयच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याने साकारलेल्या कलाकृतीचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT