bigg boss ott 3 sakal
Premier

Anil Kapoor: बिग बॉस विजेत्या अभिनेत्रीला नाही आवडली अनिल कपूर यांची होस्टिंग; म्हणते- झक्कास वाल्यांची जागा...

Bigg Boss Winner Actress On Anil Kapoor: 'बिग बॉस ओटीटी ३'ची होस्टिंग अनिल कपूर करत आहेत मात्र एका अभिनेत्रीला त्यांची होस्टिंग आवडली नाहीये.

Payal Naik

टीव्हीचा प्रसिद्ध आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस'च्या डिजिटल व्हर्जनचा पहिला सीझन 'बिग बॉस ओटीटी १' चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला होता. यानंतर या शोचा दुसरा सीझन सलमान खानने स्वतः होस्ट केला होता. आता या शोचा तिसरा सीझन सुरू आहे, जो बॉलिवूडचा 'झकास' अभिनेता अनिल कपूर होस्ट करत आहे. मात्र काही लोकांना त्यांचं होस्टिंग आवडत नसल्याचं चित्र आहे. नेटकऱ्यांपाठोपाठ आता बिग बॉस हिंदी सीझन ११ मधील अभिनेत्रीने अनिल कपूर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या होस्टिंगवर तिने नाराजी व्यक्त केली आहे.

झक्कास वाल्यांची आपली वेगळी जागा

ही अभिनेत्री आहे 'बिग बॉस ११' विजेती शिल्पा शिंदे. शिल्पाने 'बिग बॉस ओटीटी ३'चे होस्ट अनिल कपूर यांच्या होस्टींगवर नाराजी व्यक्त केली आहे. शिल्पा हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पापाराझी शिल्पाला ती कॉंट्रोव्हर्शिअल शो बिग बॉस ओटीटीचा हा सीझन बघते का असा प्रश्न विचारताना दिसतात. त्यावर शिल्पा म्हणते, 'जर सलमान खान होस्ट करत नाहीयेत तर बिग बॉस बघण्याचा काहीही फायदा नाही. काही मजा नाही. होस्ट नाहीये तर मजा नाहीये.' तिने अनिल कपूर यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, 'झक्कास वाल्यांची आपली वेगळी जागा आहे. पण बिग बॉस म्हणाल तर भाई भाई.'

दुसरीकडे नेटकऱ्यांना अनिल कपूर यांची होस्टिंग आवडतेय. त्यामुळे या व्हिडिओवर नेटकरी शिल्पाच्या मतावर आक्षेप घेताना दिसत आहेत. नवीन काहीतरी करून बघूया असं म्हणत अनिल यांनी या कार्यक्रमाच्या होस्टिंगला होकार दिला होता. अनिल यांनी 'नो एंट्री', 'रेस ३' या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT