Ayushmann Khurrana esakal
Premier

Ayushmann Khurrana BTS Video : ‘मी चित्रपटांशिवाय जगू शकतो; पण... , आयुष्मान खुरानाचा मोठा खुलासा

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते.

सकाळ वृत्तसेवा

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. त्याचे नुकतेच रिलीज झालेले ‘रेह जा’ हे गाणे अशा लोकांसाठी आहे, जे आपल्या जोडीदारापासून दूर असताना एकमेकांबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात. त्याच्यासोबत या गाण्यात हरजोत कौरने तिचा आवाज दिला आहे. या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

या गाण्याचे बीटीएस समोर आले आहेत. यामध्ये आयुष्मानने एक मनोरंजक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, त्याचे आयुष्य संगीताशिवाय काहीच नाही. तो असेही म्हणाला, ‘मी चित्रपटांशिवाय जगू शकतो; पण संगीताशिवाय जगू शकत नाही.

माझ्या आयुष्यातील लहान-लहान क्षण आणि छोट्या छोट्या गोष्टींचे सौंदर्य मी मनापासून जपतो. मी छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होतो आणि छोट्या गोष्टींनी आनंदीदेखील होतो.’ आयुष्मान अलीकडे ‘ड्रीम गर्ल २’मध्ये दिसला होता. याशिवाय तो सारा अली खानसोबत ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आणि करीना कपूर खानसोबत एका चित्रपटात झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दादरमध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू; १० ते १२ जण जखमी

Maharashtra Farmer Loan Waiver : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाणे मनपाच्या चौथ्या मजल्यावर आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Konkan Railway Recruitment : कोकण रेल्वेचा अजब कारभार! 132 पदांसाठी भरती कोकणात, पण मुलाखती चक्क आंध्र प्रदेशात; स्थानिक तरुणांमध्ये तीव्र संताप

SCROLL FOR NEXT