diljit dosanjh and kapil sharma sakal
Premier

Chamkila Movie : 'चमकीला सिनेमासाठी दिलजीतने नाही म्हंटल असतं तर आम्ही केली होती कपिल यांची निवड'; इम्तियाज अली यांनी केला खुलासा

कपिल शर्माच्या नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमाचा नवीन एपिसोड नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला.

सकाळ वृत्तसेवा

कपिल शर्माच्या नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमाचा नवीन एपिसोड नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या एपिसोडमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अमरसिंग चमकीला या सिनेमाच्या प्रोमोशन निमित्ताने सिनेमाची टीम इम्तियाज अली, परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांज यांनी हजेरी लावली. नुकतेच कपिलने या शोचे काही बिहाइंड द सीन सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये कपिल आणि इम्तियाज अली यांनी केलेल्या खुलास्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

कपिलने यावेळी सगळ्यांना सांगितलं,' मी एकदा रहमान सरांना भेटलो आणि ते मला म्हणाले,’मी तुला चमकीलासाठी फोन केला होता.’ मला वाटलं कि त्यांना माझ्याकडून कोणतंतरी गाणं गाऊन घ्यायचं असेल कि काहीतरी. मला वाटलं ते असंच माझ्याशी चांगलं बोलतायत.' त्यावर इम्तियाज यांनी उत्तर दिलं कि,”मलाही ही रहमान यांनीच सांगितलं कि तू फार छान गातोस. जर दिलजीतने ही फिल्म केली नसती तर आमची दुसरी चॉईस तू होतास.” ते ऐकून सगळेचजण हसू लागले.

तर यावेळी इम्तियाज यांनी दिलजीतला त्यांनी या सिनेमासाठी का निवडलं याचा खुलासाही केला. त्यांनी म्हंटलं कि, 'एकदा मला शाहरुख म्हणाला होता कि या देशात जर कोण चांगला अभिनेता असेल ना तर तो दिलजीत आहे.' हे बोलणं ऐकून सगळेचजण खुश झाले आणि त्यांनी दिलजीत यांचं कौतुक केलं.

दिलजीत या सिनेमात अमरसिंग चमकीला यांची भूमिका साकारत असून परिणीती चोप्राने त्यांची पत्नी अमरजोतची भूमिका साकारली आहे. ए आर रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलं असून सोशल मीडियावर या सिनेमाची चर्चा आहे.

दरम्यान नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला अमरसिंग चमकीला हा सिनेमा ‘इल्व्हिस ऑफ पंजाब’ म्हणून प्रसिद्ध असलेले गायक अमरसिंग चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ८० च्या दशकात एका कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. समाजातील समस्या गाण्यांच्या माध्यमातून मांडण्यासाठी चमकीला हे प्रसिद्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT