divyanka tripathi  sakal
Premier

Actress Robbed In Europe: गाडीची काच फोडून कोट्यवधींचं सामान लंपास; पतीसह परदेशात अडकली अभिनेत्री, मायदेशी परतण्यासाठी मागतेय मदत

Divyanka Tripathi Robbed In Europe: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पतीसह परदेशात अडकली आहे. तिने परत भारतात परतण्यासाठी मदत मागितली आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. दिव्यांका सध्या तिचा पती विवेक दहिया याच्यासोबत परदेशात अडकली आहे. परदेशात त्यांचं सामान चोरी झाल्याने तिने सोशल मीडियावरून मदत मागितली आहे. नेमकं काय घडलं?

दिव्यांका तिच्या पतीसोबत सध्या युरोपमध्ये फिरायला गेली होती. तिने तिथले सुंदर फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते. मात्र आता ते दोघेही परदेशात अडकले आहेत. त्यांचे पासपोर्ट, पर्स आणि १० लाखांचं मौल्यवान सामान चोरी झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विवेकने घडला प्रकार चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने सांगितलं, 'आमची ट्रिप खूप चांगली सुरू होती, शिवाय ही एक घटना वगळला. आम्ही काल (बुधवारी) फ्लॉरेन्सला पोहोचलो आणि तिथे एक दिवस राहायचं ठरवलं. आम्ही राहण्यासाठी जे ठिकाण निवडलं होतं ते पाहायला गेलो आणि आमचं सर्व सामान बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये तसंच ठेवलं.'

पुढं तो म्हणाला, 'पण जेव्हा आम्ही आमचं सामान घेण्यासाठी परत आलो, तेव्हा समोरचं दृश्य पाहून आम्हाला धक्का बसला. कारची काच फोडून आमचे पासपोर्ट, पर्स, पैसे, खरेदी केलेल्या वस्तू आणि जवळच्या मौल्यवान वस्तू सगळंच चोरीला गेलं होतं. कारमध्ये फक्त आमचे काही जुने कपडे आणि खाण्याच्या वस्तू उरल्या होत्या. आम्ही स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमची तक्रार घ्यायला नकार दिला. कारण त्या विशिष्ट भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे ते आम्हाला मदत करू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं.'

तो पुढे म्हणाला, 'तसेच पोलीस स्टेशन संध्याकाळी सहा वाजता बंद होतं आणि त्यानंतर ते कोणतीही मदत करू शकत नाही, असं ते म्हणाले. आम्ही दूतावासाशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तेही बंद झालं होतं. आता आम्ही एका छोट्या शहरात राहत आहोत आणि एक हॉटेलचा स्टाफ आमची मदत करतोय. आमच्याकडे पैसे नाहीयेत आणि आम्हाला भारतीय दूतावासाची मदत हवी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT