sushant shelar  esakal
Premier

याला नक्की झालंय तरी काय? 'दुनियादारी' गाजवणाऱ्या अभिनेत्याला पाहून चाहते चिंतेत; ओळखही पटत नाहीये

Sushant Shelar Viral Video: लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो चर्चेचा विषय बनला आहे.

Payal Naik

सध्या 'धर्मवीर २'ची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा ग्रँड प्रीमिअर नुकताच मुंबईत पार पडला. या प्रीमिअरला अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या प्रीमिअरदरम्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक मराठी अभिनेता दिसत आहे ज्याला पहिल्यांदा पाहिल्यावर त्याला ओळखणंही कठीण झालंय. तो अतिशय वेगळा दिसत असल्याने नेटकरी त्याला पाहून चाट पडले आहेत. त्यात त्याचा लूक पूर्ण वेगळा दिसतोय. त्यामुळे त्याच्या तब्येतीला काही झालंय का अशी विचारणा चाहते करत आहेत. हा अभिनेता आहे सुशांत शेलार.

हम सस्ती चीजोका शॉक नही रखते म्हणत ज्या अभिनेत्याने 'दुनियादारी' गाजवली तो अभिनेता म्हणजे सुशांत शेलार. सुशांतच्या चित्रपटातला लूक पाहून तेव्हा अनेक चाहते त्याच्यावर फिदा झाले होते. मात्र आता त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्याच्या काळजीत पडले आहेत. या व्हिडिओमध्ये सुशांत खूप बारीक झाल्याचं दिसत आहे. तो आजारी असल्यासारखा दिसत आहे. त्यामुळे चाहते त्याच्याबद्दल चौकशी करत आहेत. अनेकांनी तर सुरुवातीला त्याला ओळखलं देखील नाही. त्याला नेमकं झालंय तरी काय? त्याच्या तब्येतीची काही अडचण आहे का? हा असा का दिसतोय असे अनेक प्रश्न नेटकरी विचारताना दिसतायत.

सुशांत सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. तो सध्या शिवसेना पक्षाशी जोडला गेला आहे. अशात त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुशांतला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोबतच त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT