Janhvi Kapoor Health Latest Update  
Premier

Janhvi Kapoor Health : जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल, अनेक दिवसांपासून होती आजारी; नेमकं झालं काय?

Janhvi Kapoor Health Latest Update : जान्हवी नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत हातात हात घालून एंट्री करताना दिसली होती.

रोहित कणसे

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे, या जान्हवीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. जान्हवीला अन्नातून विषबाधा झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती ठीक नव्हती अशी माहिती समोर आली आहे. मिडीया रिपोर्टनुसार, जान्हवी प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी अखेर तिला रुग्णालयात दाखल केले आहे.

जान्हवी कपूरला दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिडीया रिपोर्टनुसार जान्हवी चेन्नईला गेली होती आणि मंगळवारी तिथून परतत असताना तिने विमानतळावर काहीतरी खायला घेतले होते. घरी आल्यानंतर जान्हवीची प्रकृती खालावली.

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी खूप अशक्त वाटत होती. त्यानंतर आज प्रकृती अधिकच बिघडल्याने कुटुंबीयांनी जान्हवीला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. सध्या जान्हवीची प्रकृती आता स्थिर असून एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.जान्हवी नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत हातात हात घालून एंट्री करताना दिसली होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच जान्हवीच्या उलझ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. चाहत्यांना हा ट्रेलर चांगलाच आवडताना दिसत आहे. या चित्रपटातील जान्हवीच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे. उलझ लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार असून जान्हवी या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे.

उलझ हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून, गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, मियांग चांग आणि आदिल हुसैन यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय जान्हवीच्या खात्यात आणखी दोन मोठे चित्रपट आहेत, ज्यात ज्युनियर एनटीआरसोबत देवरा: भाग १ आणि सनी संस्कारी की तुलसी कुमारी या चित्रपटाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT